आपल्या मनात येईल तसे वक्तव्य करणाऱ्या रमेश जारकीहोळीनंनी काँग्रेसमधील नेमके आमदार कोणत्या ठिकाणी, किती आणि कसे भाजपमध्ये सामील होणार आहेत? त्यांची नावे काय आहेत? हे जाहीर करावे. २४ तास सतत ५ आमदार भाजपमध्ये येणार आहेत, हेच वक्तव्य पुन्हा पुन्हा करणाऱ्या रमेश जारकीहोळींनी आधी स्पष्ट काय आहे ते सांगावे, अशी विचारणा केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी केली आहे.
मंगळवारी काँग्रेस भवन येथे पत्रकारांशी बोलताना रमेश जारकीहोळींच्या आमदार पक्षबदलाच्या सततच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण मागितले आहे.
हे वक्तव्य रमेश जारकीहोळी स्वतःच्या मनातील गोष्टी रचवून करत असून काँग्रेसमधील आमदार किंवा इतर लोकप्रतिनिधी भाजपमध्ये जाण्याऐवजी काँग्रेस सोडून गेलेले भाजपमधील वरिष्ठ नेतेच अद्यापही काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात असल्याचे सांगतात, हे हास्यास्पद असल्याचे सतीश जारकीहोळी म्हणाले. बेळगाव जिल्ह्यातील वरिष्ठ नेतेच काँग्रेसला आव्हान देत आहेत. त्यामुळे आगामी कालावधीत अशा आव्हानांना कृतीतून योग्य उत्तर देऊ, असेही ते म्हणाले.
काँग्रेसमधील कोणते आमदार किंवा इतर कोणते लोकप्रतिनिधी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, हे आता रमेश जारकीहोळी यांनाच विचारणे योग्य ठरेल, शिवाय काँग्रेसचे आमदार भाजपमध्ये जाऊन काँग्रेसच्याच वरिष्ठांशी सल्ला मसलत करून कामकाज करतात, असा टोलाही सतीश जारकीहोळी यांनी लगावला.