कित्येकदा निवेदन देऊन देखील बेळगाव तालुक्यातील बससेवा सुरळीत न केल्याने संतप्त पालक व विद्यार्थ्यांनी तब्बल तीन तास रस्ता रोको करत बस सेवा व्यवस्थित करा अशी मागणी केली.शनिवारी सकाळी शेकडो विद्यार्थ्यानी पश्चिम भागातील बीजगरणी फाटा तब्बल तीन तास बेळगुंदी येथे रस्ता रोको केला होता.
गेल्या कित्येक महिन्या पासून राज्य परिवहन मंडळाच्या चालकांच्या मनमानी कारभाराने वेळेत बस फेऱ्या न आल्याने बेळगुंदी परिसरातील बस नित्यनियमाने जात नसल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना तसेच प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
या भागात बिजगरणी कावळेवाडी, बेळवटटी ,इनाम बडस, बाक़नूर, गोळ्याली, बेटगेरी, सोनोली यलेबैल, राकस्कोप सह धामणे या गावातील अनेक विद्यार्थी या बस वर अवलंबून असतात मात्र परिवहन महामंडळ या कड़े जाणीव पूर्वक दुर्लक्षित केले जात असल्याचा आरोप तालुका पंचायत सदस्य नारायण नलवडे यानी प्रशासनावर केला.या परिसरातील गावामध्ये अनेक विद्यार्थी, कामगार,प्रवाशयाना दररोज बेळगाव शहराला या ना त्या कारणाने यावे जावे लागते. मात्र लॉक डाउन नंतर अपुऱ्या आणि अनियनित बस फेऱ्या असल्याने विद्यार्थांचे खुप मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे.
बेळगाव ग्रामीण भागातील पश्चिमअनियमित बसची खुप मोठी समस्या असून याची दखल प्रशासन ने घेतली नाही तर येणाऱ्या काही दिवसात उग्र आंदोलन हाती घेण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र एकीकरण विद्यार्थी संघटना च्या माध्यमातून सिद्धार्थ चौगुले यानी प्रशासनाला दिला.
त्यावेळी जिल्हा पंचायत सदस्य मोहन मोरे, सह ग्रामपंचायत सदस्य , असंख्य विद्यार्थी परिसरातील नागरिक यांनी या मध्ये सहभाग झाले होते.परिवहन महामंडळाचे अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन बस नियमित सर्व वेळेत फेऱ्या मारण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.