बेळगाव तालुक्यातील पूर्व भागात एका घरासमोर अजगर साप सापडला असून सर्प मित्र आनंद चिट्टी यांनी सदर सापाला जीवनदान दिले आहे.अलारवाड येथील शेतकरी शंकर गौडा यांच्या घरासमोर रात्री अचानक आढळून आलेल्या अजगर सापाला सर्पमित्र आनंद चिट्टी यांनी पकडले.
अलारवाड येथील शेतकरी शंकर गौडा यांच्या घरासमोर लाकडाच्या ढोलीत बसलेला अजगर आढळताच तात्काळ सर्पमित्र आनंद चिट्टी यांना पाचारण करण्यात आले. आनंद चिट्टी यांनी सापाला पकडले असून वनविभागाच्या सहकार्याने सुरक्षित स्थळी सोडण्यात येईल असे सांगितले.
मागील 17 महिन्यातील बेळगाव परिसरात पकडण्यात आलेला हा तिसरा अजगर आहे. गेल्या 2 वर्षात सातत्याने येत असलेल्या महापुरामुळे हे अजगर साप आढळून येत असून आज पकडण्यात आलेला हा अजगर मादी जातीचा असून 7 फूट 3 उंच लांब तसेच 14 किलो वजनाचा आहे.
साधारण 4 वर्षाचा हा साप असून बिनविषारी सर्प आहे. हा अजगर साप 25 फुटापर्यंत वाढू शकतो. रंगाने तपकिरी व अंगावर जाळीदार नक्षी असलेला हा साप घोणस सारखाच दिसतो. घनदाट जंगलात, नदीकाठी, दाट झाडी व दलदलीत आढळून येणारा हा अजगर साप 100 अंडी घालू शकतो. तसेच अंड्याना ऊबही देतो. तो घुशी, उंदीर, पक्षी, ससा, हरण व डुक्कर यांनादेखील भक्ष बनवतो.
भक्ष्याला आवळून ठार मारणारा हा साप निशाचर असून माणसापासून लांब राहतो. भारतभर आढळणाऱ्या या सापाचे अस्तित्व जंगले नष्ट होत असल्याने याचे धोक्यात आले आहे, असे सर्पमित्र आनंद चिट्टी यांनी सांगितले.
https://www.facebook.com/375504746140458/posts/1333613703662886/
Nice sir