राज्यातील विविध खाजगी रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालयावर आयटी विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली.
वाहनावर आंतरराज्य फुटबॉल टुर्नामेंटचे स्टिकर्स चिटकवून खाजगी रुग्णालये तसेच वैद्यकीय महाविद्यालयामध्ये व्यापक स्वरूपात धाड टाकून पाहणी केली आहे.
सामान्यतः महसूल विभागाच्यावतीने अशा कारवाया गौप्य पद्धतीने केल्या जातात. परंतु यावेळी करण्यात आलेली कारवाई ही पूर्वनियोजित असल्याचे समजते.
वाहनांवर आंतरराज्य फुटबॉल टुर्नामेंटचे स्टिकर्स चिटकवून आयटी अधिकाऱ्यांच्या पथकाने राज्यातील बंगळूर, दावणगेरे, तुमकूर, मंगळूर, नेलमंगल अशा विविध ठिकाणी धाड टाकली आहे.
कोरोना काळात खाजगी रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याची माहिती सातत्याने पुढे येत होती.
या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध ठिकाणी एकाचवेळी आयटी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने धाड मोहीम हाती घेतली.