हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात एका खून प्रकरणात आरोपी म्हणून शिक्षा भोगत असलेल्या तरुणाने धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कारागृहातील गैरप्रकार समोर आला असून याप्रकरणी कारागृहातील अधीक्षक चौकशी करत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
हत्येप्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या तौसिफ नामक कैद्याने एका महिलेला फोन लावून तीन लाख रुपये दे अन्यथा तुला बघून घेऊ अशी धमकी दिल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यामुळे कारागृहातील या कारभाराबद्दल जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
बेळगाव हिंडलगा कारागृहात असलेला आरोपी तौसिफ याने स्नेहा देसाई या व्यावसायिकेला धमकी दिल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. धारवाडस्थित शेट्टर कॉलनी येथे दहावी वर्गात या दोघांची मैत्री होती. त्यानंतर व्यवसायासाठी स्नेहा या महिलेने त्याच्याकडून पैसे घेतले होते ते व्याजासहित परत केले आहेत. मात्र आता मला आणखी तीन लाख रुपये दे अन्यथा तुला बघून घेऊ अशी धमकी हिंडलगा कारागृहातुन फोनवरून दिल्याचे समजते.
स्नेहा आणि तौसिफ एसएसएलसीमध्ये मित्र आहेत. व्याज दिल्यानंतर स्नेहाने व्याजासहित रक्कम तौसिफला परत केली होती. धमकीच्या या प्रकारामुळे हिंडलगा कारागृहातील सावळा गोंधळ पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याची चर्चा जोरदार सुरू झाली आहे.