मनपा समोरील अनाधिकृत ध्वज काढण्यास टाळाटाळ करणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मराठा मंडळ महाविद्यालयात महाराजांचा बॅनर काढण्यासाठी दबाव आणणाऱ्या प्रशासनाचा युवा समितीच्या बैठकीत निषेध करण्यात आला.
महाराष्ट्र एकीकरण समितीची व्यापक बैठक रविवारी संपन्न झाली अध्यक्षस्थानी युवा समिती चे अध्यक्ष शुभम शेळके हे होते. बैठकीत युवा समितीची नवीन कार्यकारणी एक मताने निवडण्यात आली.बैठकीच्या सुरुवातीला सौ प्रभावती पाटील यांना व इतर मृतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
मागील बैठकीत कार्यकारणी साठी अर्ज मागविण्यात आले होते त्याप्रमाणे आणि उपस्थितांच्या सूचनेप्रमाणे पुढील दोन वर्षांकरिता नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली, नवीन पदाधिकारी खालील प्रमाणेकार्याध्यक्ष सुरज कुडूचकर, उपाध्यक्ष अंकुश केसरकर उपाध्यक्ष सचिन केळेकर, सरचिटणीस श्रीकांत कदम, चिटणीस अभिजीत मजूकर चिटणीस सागर पाटील, खजिनदार मनोहर हुंदरे, उपखजिनदार विनायक कावळे, हिशोब तपासणीस वासू सामजी, प्रवक्ता अश्वजीत चौधरी व मनोज पाटील, सोशल मीडिया प्रमुख साईनाथ शिरोडकर, उपप्रमुख सुधीर शिरोळे , शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख सिद्धार्थ चौगुले, प्रतीक पाटील, प्रवीण कोराने , अजय सुतार , अनुशासन समिति मनोहर हुंदरे, संतोष कृष्णाचे, अभिजीत मजुकर, विनायक कावळे ,
सल्लागार संघटक संतोष कृष्णाचे, धनंजय पाटील, किरण हुद्दार, चंद्रकांत पाटील, विशाल गौंडाडकर, अमित देसाई, विजय जाधव, नितीन आनंदाचे, रोहन लंगरकांडे, नागेश बोबाटे, कुणाल पाटील, रंजीत हवळणाचे, गुंडू कदम, शिवाजी मेणसे, प्रसाद मरगाळे, किशोर मराठे, महेश जाधव, राकेश सावंत, किरण मोदगेकर, उमेश जाधव, रोहन कुंडेकर, दीपक देसाई, महांतेश आलगोंडी, बापू भडांगे, नारायण मुचंडीकर, सागर कणबरकर, भावेश बिर्जे, सचिन दळवी, सुरज चव्हाण, युवराज मालकाचे ज्ञानेश्वर मनुरकर , राजू पाटील, सतीश कुगजी, रोहित गोमनाचे , संकेत रवळूचे, अभिषेक काकतीकर, प्रवीण रेडेकर, आशिष कोचेरी, ज्योतिबा पाटील आणि इतर नावे समाविष्ट करण्यात येतील.
वरील पैकी आणि इतर सहकाऱ्यांचा समावेश विभाग प्रमुख, विभाग आणि गाव संघटक आणि इतर पदांसाठी विभागवार बैठकीत करण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला.
बैठकीला मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.