दक्षिण – पश्चिम रेल्वेने म्हैसूर ते मुंबई साठी रेल्वे फेरीचे आयोजन केले आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी आठवड्यातून एक फेरी म्हैसूर ते मुंबई या पल्ल्यासाठी होणार आहे. म्हैसूर जंक्शन ते मुंबई या पल्ल्यासाठी १४ फेब्रुवारी २०२१ पासून प्रवाशांच्या सोयीसाठी दाखल होणारी ही रेल्वे (रेल्वे क्रमांक : ०१०३६) प्रत्येक रविवारी सकाळी ६.१५ वाजता म्हैसूर जंक्शन येथून निघणार आहे.
त्यानंतर दुसरे दिवशी ५.३० वाजता दादर येथे पोहोचणार आहे. त्यानंतर दादर रेल्वे स्थानकावरून (रेल्वे क्रमांक ०१०३५) 11 फेब्रुवारीपासून सुरु होणारी रेल्वे प्रत्येक गुरुवारी रात्री ९.३० वाजता निघून म्हैसूर जंक्शन वर दुसरे दिवशी रात्री ९.४० वाजता पोहोचेल.
सदर रेल्वे 1AC -2, 3AC-3, ८ स्लीपर क्लास आणि ५ सेकंड क्लास आसन सुविधा असणारी (रेल्वे क्रमांक ०१०३५) कृष्णराजनगर, होळे नरसीपुर, हासन, अरसिकेरे, कादूर, बिरूर, दावणगेरे, हरिहर,
राणीबेन्नूर, हावेरी, SSS हुबळी, धारवाड, अळणावर, लोंढा, बेळगाव, घटप्रभा, कुडची, मिरज, सांगली, कराड, सातारा, पुणे, कर्जत आणि कल्याण या स्थानकावर थांबणार आहे. या रेल्वेसेवेसंदर्भातील परिपत्रक दक्षिण – पश्चिम रेल्वेने नुकतेच प्रसिद्धीस दिले आहे.