बेळगाव जिल्ह्यातील खानापूर मतदार संघ हा ८० टक्के वनक्षेत्र आहे. या भागाच्या आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर यांनी आतापर्यंत अनेक विकासकामे केली आहेत. शिवाय या भागातील जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठीही त्या प्रयत्नशील आहेत. खानापूर मधील अत्यंत घनदाट अरण्य असलेल्या प्रदेशात विजेची सोय करून तेथील लोकांसाठी त्या एक आदर्श ठरल्या आहेत.
खानापूरमधील इंदिरानगर या भागात गेल्या ३० वर्षांपासून वीज नाही. संपूर्ण अंधारात असलेला हा भाग अंजलीताईंच्या प्रयत्नांमुळे उजळून निघाला आहे. गेल्या ३० वर्षांपासून या भागात वीज जोडणीची मागणी करण्यात येत होती. खानापूर भागाचा संपूर्ण विकास करण्याचा ध्यास घेतलेल्या डॉ. अंजलीताईंनी एकामागोमाग एक अशा विकासकामांचा सपाटा लावला असून आजपर्यंत कोणत्याही नेत्याला जमल्या नाहीत, अशा सर्व गोष्टी अंजलीताई पूर्ण करत आहेत.
त्यांच्या काम करण्याच्या या अंदाजामुळे या भागातील जनतेच्या त्या सर्वोत्कृष्ट महिलानेत्या बनल्या आहेत. जनतेच्या कोणत्याही समस्या आपल्यापुढे आल्या कि त्या समस्या सोडविण्यासाठी अंजलीताई नेहमीच अग्रस्थानी असतात. इंदिरानगरमधील नागरिकांच्या घरापर्यंत वीजजोडणी करून त्यांच्या आयुष्यात देखील प्रकाश टाकण्यात डॉ. अंजलीताई यशस्वी झाल्या आहेत.
या गावात वीज जोडणी केल्याची माहिती याच गावातील एका युवकाने फेसबुक वर पोस्ट केली आहे. खानापूर भागाच्या सर्वांगीण विकासासाठी तत्पर असणाऱ्या डॉ. अंजलीताई खानापूरमध्ये हायटेक बसस्थानक निर्मितीदेखील करत आहेत.