‘लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटी लि’तर्फे ‘धनलाभ’ ही नवीन मुदत ठेव गुंतवणूक योजना संस्थेच्या सभासदांसाठी सादर करण्यात आली आहे. १ फेब्रुवारी २०२१ ते ३१ मार्च २०२१ या मर्यादित कालावधीसाठी ही योजना उपलब्ध असणार आहे.
सदर योजनेचा कालावधी १३ महिन्यांच्या असून किमान गुंतवणूक दहा हजार रूपये आणि एक हजाराच्या पटीत सभासद गुंतवणूकदारांना रक्कम गुंतविता येणार आहे ज्याला ८.७५ टक्के इतका व्याजदर आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांना या योजनेत ०.५० टक्क्यांचा अतिरिक्त व्याजदराचा लाभ आहेच.
‘ऑनलाईन डिजिटल प्लॅटफॉम’च्या माध्यमातून सभासद गुंतवणूकदारांना घरबसल्या या योजनेमध्ये पैसे गुंतवीत येतील. ‘लोकमान्य सोसायटी’च्या कोणत्याही शाखेत किंवा १८०० २१२ ४०५० या क्रमांकावर संपर्क साधून सभासद, गुंतवणूकदारांना या मुदत ठेव योजनेचा लाभ घेता येईल.
कमीतकमी कालावधी आणि आकर्षक व्याजदर असलेल्या या मुदतठेव योजनेमध्ये अधिकाधिक सभासदांनी सहभागी होण्याचे आवाहन लोकमान्य सोसायटीतर्फे करण्यात आले आहे. लोकमान्य सॊसायटीच्या विविध ठेव योजनांबरोबरच विमा सेवा, अत्यावश्यक बिले भरण्याची सुविधा, फास्टटॅग सुविधा आदी सेवा-सुविधाही संस्थेच्या शाखांमध्ये उपलब्ध आहेत