वंटमुरी येथील शेवटचा बस स्टॉप साई मंदिर समोर गेल्या अनेक दिवसांपासून पाणी वाया जात आहे. मात्र याकडे स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असून तातडीने ही गळती थांबवावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. आतापर्यंत हजारो लिटर पाणी वाया गेले असून हेच पाणी जर गावातील नागरिकांना मिळाले असते तर बरे झाले असते असे जाणकारांतून बोलले जात आहे.
मागील चार ते पाच दिवसापासून वंटमुरी येथे पाणी वाया जात आहे. मात्र याकडे कोणाचेच लक्ष नाही. त्यामुळे आतापर्यंत हजारो लिटर पाणी वाया गेले आहे. दरम्यान पुढे येणाऱ्या उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण झाली तर त्याला कारणीभूत कोण? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. त्यामुळे ही गळती रोखण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे.
परिणामी रस्त्यावर हजारो लिटर पाणी वाया जात असल्याचे दिसून देखील याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. पाईप फुटल्याने दररोज 24 तास हे पाणी वाया जात आहे. स्मार्ट सिटी काम करतेवेळी खोदाई दरम्यान ही पाईप फुटले आहे. मात्र याकडे कोणाचेच लक्ष नसून आतापर्यंत हजारो लिटर पाणी वाया गेले आहे. तातडीने हे पाणी गळती थांबवावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
शहर आणि परिसरात अशा अनेक ठिकाणी पाणी वाया जात असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. मात्र याकडे अनेकांचे दुर्लक्ष झाले असून आता तरी अशा प्रकारांकडे लक्ष द्यावे अशी मागणी जोर धरू लागली आहे. स्मार्ट सिटीच्या नावाखाली अनेक ठिकाणी खोदाई करून पाईप फोडण्याचे काम वारंवार सुरूच असते.
मात्र ती दुरुस्ती करण्याकडे दुर्लक्ष करण्यात न आल्याने एकच संताप व्यक्त करण्यात येत आहे. आता तरी अशा प्रकारांवर आळा घालण्यासाठी प्रयत्न व्हावेत अशी मागणी होत आहे.