कर्नाटकाचे जलसंपदा मंत्री रमेश जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली येथील कर्नाटक विधानभवनात कृष्णा, कावेरी, म्हादई प्रश्नी आंतरराज्य लवादाप्रश्नी चर्चा करण्यासाठी कायदे तज्ञ् आणि तांत्रिक सल्लागारांची महत्वपूर्ण बैठक पार पडली.
कर्नाटकातील कृष्ण – कावेरी, म्हादई आणि आंतरराज्य पाणी वाटपाबाबत सुरु असलेल्या सर्वोच्च न्यायालयातील खटल्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली.
कायदेतज्ञ् आणि तांत्रिक सल्लागारांसमवेत नवी दिल्ली येथील कर्नाटक भवनात जलसंपदा मंत्री रमेश जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत कर्नाटकातील प्रमुख नद्यांच्या पाणी वाटपाविषयीही चर्चा करण्यात आली. तसेच सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या म्हादई आणि कृष्णा कावेरी नदीच्या लवादाबाबत पुढील वाटचालीबाबतही चर्चा करण्यात आली.
या सभेला ऍडव्होकेट जनरल प्रभुलिंग नावदगी, सिनियर ऍडव्होकेट मोहन कातरकी, ऍडव्होकेट व्ही. एन. रघुपति, निशांत पाटील, राजेश्वर, सरकारचे अप्पर मुख्य कार्यदर्शी राकेश शिंग, जलसंपदा विभागाचे कार्यदर्शी अनिल कुमार आणि जलसंपदा विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते.