विविध पदांच्या नेमणुकीसाठी २८ फेब्रुवारी रोजी बेळगाव जिल्ह्यात केपीएससी परीक्षांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी दिली.
जिल्ह्यात १०४ विविध परीक्षा केंद्रांवर केपीएससी परीक्षा घेण्यात येणार असून ठरलेल्या केंद्रांवरच या परीक्षा घेण्यात येणार असून परीक्षा केंद्रात कोणताही बदल करण्यात येणार नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
जिल्हा पंचायत सभागृहात केपीएससी परीक्षेसंदर्भात झालेल्या अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षण शिबिरात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले कि, बेळगावमधील विविध १०४ परीक्षा केंद्रांवर या परीक्षा घेण्यात येणार असून २८ फेब्रुवारी रोजी या परीक्षांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी १० ते ११.३० आणि दुपारी २ ते ३.३० या दोन विभागात परीक्षा होणार आहेत. एकूण ३६९४२ विद्यार्थी या परीक्षेला उपस्थित राहणार आहेत. विद्यार्थ्यांची उत्तमरीत्या सोय करण्यात यावी, अशी सूचना त्यांनी दिली.
यावेळी शिक्षण विभागाचे अधिकारी ए. एन. प्याटी, अपर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, बेळगाव जिल्हा शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.