कर्नाटक लोकसेवा आयोगाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या प्रथम श्रेणी सहायक पदाच्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका गहाळ झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यामुळे २४ जानेवारी रोजी घेण्यात येणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. आता ही परीक्षा रविवार दिनांक २८ फेब्रुवारी रोजी घेण्याचे ठरविण्यात आले आहे.
कर्नाटकातील विविध ठिकाणी सहाय्यक / प्रथम श्रेणी सहाय्यक पदासाठी रिक्त असलेल्या जागांसाठी ही परीक्षा घेण्यात येणार होती. या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका अचानक फुटल्याची माहिती समोर आली.
दरम्यान या प्रश्नपत्रिकांची किंमत लाखोंच्या घरात असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली. याप्रकरणात सामील असलेल्या आरोपींना अटक करण्यात आली असून आता नव्याने येत्या २८ फेब्रुवारी रोजी सदर परीक्षांचे आयोजन करण्यात आले आहे.
या परीक्षेसाठी सर्व खबरदारी बाळगून परीक्षा घेण्यात येणार असल्याचे निवेदन कर्नाटक लोकसेवा आयोगाच्या वतीने जारी करण्यात आले आहे.