कित्तूर तालुक्यातील इटगी क्रॉसनजीक असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वर दोन लॉरीमध्ये झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर आणखी एकजण गंभीररीत्या जखमी झाला आहे. जखमींवर बेळगाव जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
बेळगावपासून धारवाड कडे जाणाऱ्या लॉरींमध्ये इटगी क्रॉनजीक असणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वर आपल्यासह येणाऱ्या आणखी एका लॉरिचालकाची वाट पाहत, चुकीच्या पद्धतीने रस्त्यावर थांबविण्यात आलेल्या लॉरीला मागून येणाऱ्या लॉरीने धडक दिली.
हि धडक इतकी भीषण होती, की मागून येणाऱ्या लॉरिचालकासह दुसऱ्या लॉरिचालकाचाही या धडकेत मृत्यू झाला. या दोन मृतांपैकी एकाच मृत्यू जागीच झाला तर दुसऱ्या चालकाचा मृत्यू धारवाड येथील जिल्हा रुग्णालयात झाला.
या मृतांमध्ये गदग जिल्ह्यातील कुडलप्पा नेल्लुर (वय ४२), गदग जिल्ह्यातील विरापूर गावातील निवासी यल्लापा सन्नयल्लप्पा घोरपडे (वय ५२) यांचा समावेश आहे. दुसऱ्या लॉरीमधील राकेश (वय ३७) ही व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे.
त्याच्यावर बेळगाव जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी कित्तूर पोलीस स्थानकाचे सीपीआय मंजुनाथ कुसगल, पीएसआय देवराज उळागड्डी यांनी भेट देऊन पंचनामा केला. या घटनेची नोंद कित्तूर पोलीस स्थानकात करण्यात आली आहे.