खडेबाजार हेड कॉन्स्टेबलना डीसीपी डॉ. विक्रम आमटेंनी गौरविले
बेळगाव खडेबाजार पोलीस स्थानकाच्या व्याप्तीत दाखल करण्यात आलेल्या तक्रारींवर एससी/एसटी कायद्यांतर्गत आरोपींचा त्वरित शोध घेण्यात यशस्वी ठरलेले हेड कॉन्स्टेबल एस. एम. शिंदे यांचे प्रशस्तीपत्र देऊन डीसीपी विक्रम आमटेंनी कौतुक केले.
दाखल करण्यात आलेले प्रकरण हे कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून अत्यंत संवेदनशील असे आहे. या प्रकरणातील फरारी आरोपीचा कमी कालावधीत शोध घेऊन प्रकरणाचा छडा लावण्यात अप्रतिम कार्य करण्यात आल्यामुळे खडेबाजार पोलीस स्थानकाचे हेड कॉन्स्टेबल शंकर एम. शिंदे यांचा गौरव करण्यात आले.
बुधवारी आपल्या कार्यालयात डीसीपी विक्रम आमटेंनी एस. एम. शिंदे यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविले.
गुरुवारी जनसंपर्क सभेचे आयोजन
खडेबाजार पोलीस स्थानकात गुरुवार दिनांक 4 फेब्रुवारी रोजी जनसंपर्क सभा बोलाविण्यात आली आहे. या सभेसाठी कायदा आणि सुव्यवस्था विभाग तसेच इतर रहदारी पोलीस विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. खडेबाजार पोलीस स्थानकाच्या हद्दीत येणाऱ्या नागरिकांनी सल्ला, अभिप्राय आणि इतर सुचनांसाठी गुरुवारी सायंकाळी 4.30 ते 6.00 या वेळेत होणाऱ्या या सभेसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन डीसीपी विक्रम आमटे यांनी केले आहे.