कणबर्गी येथील सर्व्हे क्रमांक ४२३/१ येथील जागेवर अतिक्रमण करून संबंधित जागेच्या मालकाला मारहाण केल्याप्रकरणी तिघाजणांविरोधात माळमारुती पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सन २००५ मध्ये खरेदी केलेल्या जागेवर अतिक्रमण करण्यात आले असून आपल्यावर अत्याचार करण्यात आला असल्याची फिर्याद जागामालक इंदिरा भीमाप्पा नरसगोळ यांनी पोलिसांकडे दिली आहे.
सैन्यात असलेले आपले पती भीमाप्पा नरसगोळ यांनी ही जागा २००५ साली खरेदी केली होती. या जागेवर इतरांनी अतिक्रमण केले असून माझ्यावर अत्याचार करण्यात आला असल्याचे संबंधित महिलेने म्हटले आहे. मुरुगेन्द्रगौडा पाटील, बसवराज यळ्ळूरकर, बाहुबली वीरगौड या तिघांनी आपल्या मुलाचा पाठलाग करून मारहाण केली असून पोलिसांनी या तिघांवर कारवाई करावी, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे. सदर प्रकरण सौदा करून मिटविण्यासाठी दबाव आणण्यात येत असल्याचाही आरोप इंदिरा नरसगौड यांनी केला आहे.
संबंधित जागा ही नरसगोळ यांच्या मालकीची असून या जागेवर बेकायदेशीर अतिक्रमण करण्यात आले आहे. शिवाय याबाबत कोठेही वाच्यता होऊ नये यासाठी हे प्रकरण मिटविण्यासाठी दबाव आणण्यात येत असून आपल्या मुलावर हल्ला करण्यात आलेल्या आरोपींवर कारवाई करण्याची मागणी इंदिरा नरसगोळ यांनी माळमारुती पोलीस स्थानकात केलेल्या तक्रारीत केली आहे.