सध्या सर्वच व्यवहार डिजिटल पद्धतीने होत असून यामध्ये नागरी सुविधांचाही समावेश करण्यासाठी नागरिकांच्यावतीने मागणी करण्यात येत होती. बेळगावमधील नागरी सुविधांसंदर्भातील अनेक कर हे रोख रकमेच्या स्वरूपातच भरून घेतले जातात. परंतु गेल्या वर्षभरापासून उद्भवलेल्या कोविड परिस्थितीमुळे अनेक नागरिकांनी ऑनलाईन पेमेंट पद्धतीला पसंती दिली आहे.
आता अनेक खाजगी संस्थांपाठोपाठ नागरी सुविधाही डिजिटल पेमेन्टच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. बेळगाव महानगरपालिकेची विशेष टीम आता प्रत्येक घरोघरी आणि दुकानांमध्ये जाऊन मालमत्ता कर आकारणार आहे. या टीमच्या माध्यमातून १०० टक्के कर वसुलीचे ध्येय ठेवण्यात आले आहे.
मालमत्ता कर भरण्यासाठी पे-टीएम किंवा http://belagavicitycorp.org/ या संकेतस्थळाचा वापर करता येतो. ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्यासाठी खालील प्रक्रियेचा वापर आपण करू शकता.
सर्वप्रथम http://belagavicitycorp.org/ (Payment only by Credit/Debit/Internet Banking) या संकेतस्थळावर जाऊन PID प्रविष्ट करणे गरजेचे आहे. त्यानंतर FORM1 या ऑप्शनवर क्लिक करून ऑनलाईन पेमेंट करण्याची सुविधा उपलब्ध होते. आपल्याला PID माहित नसल्यास उपलब्ध असलेल्या निकषानुसार आपण आपले पेमेंट ऑप्शन निवडू शकता. (जसे : वॉर्ड क्रमांक, जुने मूल्यांकन क्रमांक (ओल्ड असेसमेंट नंबर), नवीन मूल्यांकन क्रमांक, मालकाचे नाव किंवा मोबाईल क्रमांक) हे सर्व तपशील भरल्यानंतर आपल्या मालमत्तेची सर्व तपशील आपल्याला दिसतील. त्यानंतर उपलब्ध असणाऱ्या view या बटणवर क्लिक करून आपण आपल्या मालमत्ता करासंदर्भातील सर्व माहिती पाहू शकता. यानंतर पेमेंट करण्याआधी आपले चलन डाउनलोड करून घ्या. कारण एकदा पेमेंट पूर्ण झाल्यानंतर आपल्याला चलन डाउनलोड करता येत नाही.
एखाद्या वेळी तुम्ही तुमचे नाव जरी view बटनाच्या माध्यमातून शोधले तरी पे-टॅक्स लिंक याठिकाणी ऍक्टिव्हेट होत नाही. यासाठी तुम्हाला वॉर्ड क्लर्क या ऑप्शनच्या माध्यमातून आपले चलन मिळवता येते.
यानंतर पुढील पानावर असणाऱ्या Form-2 OR View Tax & Pay या ऑप्शनवर क्लिक करून ऑनलाईन पेमेंटसाठी पुढे जावे. ऑनलाईन पेमेंट पूर्ण झाल्यानंतर पोचपावती ( एक्नॉलेजमेंट ) डाउनलोड करा.
यासंदर्भातील कोणत्याही पद्धतीच्या अडचणीसाठी [email protected] या मेल आयडीवर आपण आपली तक्रार नोंदवू शकता.