Thursday, May 2, 2024

/

बेळगाव जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या शंभरपेक्षा कमी!

 belgaum

कोरोनापर्व सुरु झाल्यापासून दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली होती. दिवसेंदिवस एकामागून एक अशी रुग्णसंख्या वाढलेली दिसून यायची. परंतु आता हळूहळू हि परिस्थिती पूर्वपदावर येण्याच्या मार्गावर असून बेळगाव जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या शंभरहून कमी आढळून येत आहे. बाजारपेठदेखील पूर्वपदावर येत असून लसीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या मनातील भीतीदेखील कमी होत असल्याचे निदर्शनास येत आहे.

परंतु अनेक राज्यात अजूनही कोविड रुग्णांची संख्या अजूनही म्हणावी तितकी कमी नाही. त्यामुळे दुसऱ्या बाजूला अनेकांच्या मनात धास्तीदेखील तितकीच आहे. आज जिल्ह्यात केवळ २ कोरोनारुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत.

राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याच्यावतीने जाहीर करण्यात आलेल्या कोविड आकडेवारीचा आढावा पुढील प्रमाणे आहे.

 belgaum

एकूण निरीक्षण करण्यात आलेल्या रुग्णांची संख्या : ४७५००६, १४ दिवस होम क्वारंटाईन अवधी पूर्ण केलेली एकूण रुग्णांची संख्या : ३५६०२, आयसोलेशन कक्षातील एकूण रुग्णांची संख्या : ९८, १४ दिवस क्वारंटाईन अवधी पूर्ण केलेली एकूण रुग्णांची संख्या : ४६७३६, 28 दिवस क्वारंटाईन अवधी पूर्ण केलेली एकूण रुग्णांची संख्या : ४००९५४, एकूण संग्रहित करण्यात आलेले रुग्णांचे स्वॅब नमुने : ४७३९१५, एकूण निगेटिव्ह स्वॅब नमुने : ४४३६४७, आजची पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या : २, एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या : २६७०६, एकूण कोरोनामृतांची संख्या : ३४२, डिस्चार्ज मिळालेल्या एकूण रुग्णांची संख्या : २६२६६, सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या : ९८.

आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये हुक्केरीमधील १ आणि रायबाग मधील १ अशा एकूण २ कोविड रुग्णांचा समावेश आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.