बेळगावमधील सर्वात श्रीमंत पंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंडलगा ग्रामपंचायतीवर मन्नोळकरांचीच सत्ता पुन्हा एकदा प्रस्थापित झाली आहे.
रामचंद्र मन्नोळकर पुरस्कृत ग्रामविकास लोकशाही आघाडीचे नागेश मन्नोळकर यांनी ग्रामपंचायत अध्यक्षपदी बाजी मारली आहे. तर उपाध्यक्षपदी भाग्यश्री कोकितकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
आज पार पडलेल्या निवड प्रक्रियेत नागेश मन्नोळकर यांच्याविरोधात प्रवीण पाटील आणि विठ्ठल देसाई हे दोघे अध्यक्षपदाच्या शर्यतीत होते. परंतु २० मते मिळवून नागेश मन्नोळकर यांनी आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. विठ्ठल देसाई यांनी माघार घेतली.
तर प्रवीण पाटील यांना १४ मते मिळाली. हिंडलगा ग्रामपंचायत सर्वाधिक श्रीमंत आणि उपनगरजवळील सर्वाधिक चर्चेत असणारी ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते.
मन्नोळकरांच्या निवडीनंतर समर्थकांनी गुलाल आणि फटाकड्यांची आतषबाजी करून विजयोत्सव साजरा केला.