हुबळी येथील रेल्वे यार्डाच्या दुरुस्तीचे काम करण्यात येणार असल्याने कांही रेल्वे गाड्या रद्द तर कांही रेल्वे अन्य मार्गाने वळविण्यात आल्या आहेत. त्यामुळे हुबळीमार्गे बेळगावला येणाऱ्या व जाणाऱ्या प्रवासी रेल्वे वाहतुकीवर परिणाम होणार आहे.
हुबळी ते लोकमान्य टिळक टर्मिनल (मुंबई) ही रेल्वे तब्बल 10 दिवस रद्द करण्यात आली आहे. हुबळी येथून निघणारी ही रेल्वे दि. 16 ते 25 फेब्रुवारी दरम्यान, तर लोकमान्य टिळक टर्मिनल (मुंबई) येथून निघणारी रेल्वे दि. 17 ते 26 फेब्रुवारी दरम्यान रद्द करण्यात आली आहे.
तिरुपती ते छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर रेल्वे 22 ते 23 फेब्रुवारी रोजी तर कोल्हापूर ते तिरुपती रेल्वे दि. 23 व 24 रोजी रद्द करण्यात आली आहे.
जोधपूर ते बेंगलोर रेल्वे दि. 18 व 20 फेब्रुवारी रोजी तर बेंगलोर ते जोधपूर रेल्वे दि. 15 व 17 फेब्रुवारी रोजी रद्द करण्यात आली आहे. बेंगलोर ते गांधीधाम रेल्वे दि. 20 फेब्रुवारी रोजी तर गांधीधाम ते बेंगलोर रेल्वे दि. 23 फेब्रुवारी रोजी रद्द करण्यात आली आहे.
म्हैसूर ते अजमेर रेल्वे दि. 16 व 18 फेब्रुवारी रोजी तर अजमेर ते म्हैसूर रेल्वे दि. 19 व 21 फेब्रुवारी रोजी रद्द करण्यात आली आहे. नैऋत्य रेल्वेने एका पत्रकाद्वारे ही माहिती प्रसिद्धीस दिली असून प्रवाशांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.