महाराष्ट्र, केरळ या राज्यांमध्ये पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यसरकारने सीमांवर कडक निरीक्षण ठेवण्याची सूचना दिली असल्याची माहिती परिवहन आणि उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी दिली.
सांबरा विमानतळावर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हि माहिती दिली आहे. कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र, केरळ या राज्यांमध्ये पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. नुकतीच आंतरराज्य बसवाहतुकीला सुरुवात झाली आहे. परंतु आतापासूनच जनजागृती होणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. अद्यापही कोरोनाचा धोका टळला नसून मास्क, सामाजिक अंतर आणि सॅनिटायझरचा वापर अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी आरक्षणावर बोलताना ते म्हणाले, कि पंचमसाली समाजाला आरक्षण देण्यासाठी मंत्रिमंडळात विरोध होत असल्याच्या बातम्या पुढे येत आहेत. परंतु यासंदर्भात जयमृत्युंजय स्वामींना चुकीची माहिती मिळाली आहे.
मंत्रिमंडळात यासंदर्भात कोणताही वाव-विवाद झाला नाही. बेळगाव सुवर्णसौध संदर्भातही स्वामीजींचे आम्ही समर्थन केले आहे. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका, असे आवाहन सवदी यांनी केले.
महाराष्ट्र राज्यात कन्नड भाषिकांचा सर्व्हे करण्यात येणार आहे. याविषयी ते म्हणाले कि, या गोष्टीला अति महत्व देण्याचे कोणतेही कारण नाही. जत मध्ये अधिक कन्नड भाषिक आहेत. सर्व्हे करून जे करायचंय ते करुदेत. तेथील कन्नड भाषिकांना त्रास झाला तर आम्ही विचार करू. परंतु बाहेरील राज्यातील कन्नड भाषिकांच्या मदतीसाठी आमचे सरकार नेहमीच कटिबद्ध असल्याचेही उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी सांगितले.