महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण वाढत असल्याने कर्नाटकातील सीमेवर खबरदारी घेण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे व पोलीस निरीक्षक राघवेंद्र हल्लूर यांनी मंगळवारी कर्नाटक -महाराष्ट्र सीमेच्या हद्दीवर उभारण्यात आलेल्या चेक पोस्टची पाहणी केली, तसेच नागरिकांची योग्य प्रकारे तपासणी करूनच आत प्रवेश द्यावा, अशी अशी सक्त सूचनाही केली.
पोलिस अधिकाऱ्यांच्या सूचनेमुळे महाराष्ट्रातून येणाऱ्या नागरिकांची आता काटेकोर तपासणी करण्यात येत आहे. मध्यंतरी अनलॉकमुळे कांही प्रमाणात सर्व व्यवहार व इतर व्यवसाय सुरू करण्यात आले होते. आता पुन्हा महाराष्ट्रात कोरोणाचे रुग्ण वाढत असून कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसे झाल्यास फार मोठी समस्या निर्माण होणार आहे. त्या दृष्टिकोनातून आता कर्नाटकातील सीमावर्ती भागात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
विशेष करून महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या नागरिकांची तपासणी करूनच प्रवेश दिला जात आहे. बेळगाव तालुक्यातील अतिवाड, शिंनोली यासह इतर ठिकाणांहून येणाऱ्या नागरिकांची दखील तपासणी करण्यात येत आहे. यासाठी चेक पोस्ट उभारण्यात आले आहेत. पोलीस उपायुक्त विक्रम आमटे व पोलीस निरीक्षक राघवेंद्र हल्लूरयांनी येथील चेकपोस्टची पाहणी केली आहे.
त्याचबरोबर योग्य त्या सुचनाही केल्या आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात येणाऱ्या नागरिकांची कोरोना तपासणी झालेले निगेटिव्ह आरटी-पीसीआर प्रमाणपत्र असलेल्यांनाच कर्नाटक हद्दीत प्रवेश दिला जावा असे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा झपाट्याने वाढत असल्याने अतिवाड क्रॉस येथील महाराष्ट्र-कर्नाटक सीमा हद्दीवर कोरोना चेक पोस्ट उभारण्यात आला आहे. या ठिकाणी देखील महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱ्यांची कडक तपासणी केली जात आहे.