कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन सर्व महाराष्ट्रातून येणार्या वाहनांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. मात्र कोरोना पेक्षा पोटासाठी आपल्या व्यवसायाला महत्त्व देण्यात येत आहे. राष्ट्रीय महामार्गावरही अनेक जण असेच धोकादायक वाहतूक करण्याचा प्रकार दिसून येत आहे. त्यामुळे याकडे कोण लक्ष देणार असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
बेळगाव राष्ट्रीय महामार्गावर एका खाजगी वाहनातून ही धोकादायक वाहतूक सुरू होती. बेळगाव लाईव्हने हा फोटो घेतला आहे. ही धोकादायक वाहतूक जीवघेणी असली तरी पोटासाठी काहीही म्हणण्याची वेळ सध्याच्या परिस्थितीत आली आहे.
मागील 9 महिन्यापासून कोरोनामुळे सर्व व्यवहार व्यवसाय बंद पडले होते. आता नुकतीच कामाला सुरुवात झाली आहे. काही व्यवसाय सुरळीत झाले आहेत तेवढ्यात दुसऱ्याला लाटेची म्हणून अनेक ठिकाणी निर्बंध घालण्यात येत आहेत. मात्र जर पोटात नसेल तर काय करणार या उद्देशानेच अनेक जण अशी धोकादायक वाहतूक करत आहेत.
पोटाची खळगी भरण्यासाठी हा सारा प्रयत्न आणि खटाटोप असून यासाठी नागरिक असे धोकादायक वाहतूक करत आहेत. ही वाहतूक चुकीची असली तरी त्याला पर्याय नाही असेच अनेकांतून सांगण्यात येत आहे.
त्यामुळे ही वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी कर्नाटक परिवहन महामंडळाने बससेवा सुरळीत कराव्यात अशी मागणी जोर धरू लागली आहे. याकडे आता गांभीर्याने लक्ष देऊन वाहतूक सुरळीत करावी असे बोलले जात आहे.