नव्या तंत्रज्ञाचाचा विचार करता सायबर क्राईम हे भविष्यातील मोठे आव्हान असेल, यासंदर्भात पोलीस विभाग अधिक बळकट करणे आवश्यक आहे. यासाठी बंगळूरमध्ये ८ नवे सायबर कायम स्टेशन सुरु करण्यात येतील, अशी माहिती मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी दिली.
राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या वार्षिक परिषदेला हजेरी लावल्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. देशातील सर्वात शांत राज्य म्हणून कर्नाटकाचे नाव गणले जाते. सर्व्हेक्षणानुसार मागील वर्षीच्या तुलनेत कायदा आणि सुव्यवस्था उत्तमरीत्या आहे.
गुन्हेगारीच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. महिला आणि मुलांची सुरक्षितता यासाठी प्राधान्य देण्यासंदर्भात अनेक उपाययोजना करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
अतिरेकी कारवाया रोखण्यासाठी अतिरेकी विरोधी दल स्थापन करण्यात येईल. पोलीस विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी १०१३४ वसतिगृहांची स्थापना करण्यात आली असून पुढील कालावधीत अधिकाधिक वसतिगृह निर्माण करण्यात येतील.
आपत्कालीन सेवांसाठी सुमारे ७०० वाहने खरेदी करण्यात आली आहेत. तसेच इतर सुविधा देखील लागू करण्यात आल्या आहेत. यावेळी गृहमंत्री बसवाज बोम्मई, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव रजनीश गोयल, राज्य पोलिस महासंचालक प्रवीण सूद यांच्यासह इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.