नव्या मोबाईल दुकानाकरिता जीएसटी नंबर मंजूर करण्यासाठी अर्जदाराकडून 2 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या बेळगाव वाणिज्य कर खात्याच्या एका निरीक्षकाला भ्रष्टाचार प्रतिबंधक खात्याच्या (एसीबी) पथकाने रंगेहात पकडून अटक केली.
मेहबूब बाबूलाल सिपाही असे अटक केलेल्या आरोपीच नांव आहे. काकती येथील नदीम मुल्ला यांनी जीएसटी नंबर मिळावा यासाठी अर्ज केला होता. सदर नंबर मिळवून देण्यासाठी मेहबूब याने 2 हजार रुपयांची लाच मागितली होती.
याबद्दल मुल्ला यांनी भ्रष्टाचार प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीवरून एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून मेहबूब सिपाही याला लाच घेताना रंगेहात पकडून न्यायालयासमोर हजर केले.
भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाचे एसपी बी. एस. न्यामगौडर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि डीवायएसपी वेणुगोपाल यांच्या नेतृत्वाखाली एसीबी निरीक्षक ए. एस. गुदीगोप्प, सुनील कुमार आणि कर्मचाऱ्यांनी उपरोक्त कारवाई केली