अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या गन्ह्यातून पॉक्सो कायद्यांतर्गत दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवर न्यायालयाने सुनावणी केली असून सदर प्रकरणातील आरोपीला १० वर्षांचा कारावास आणि ५५००० रुपयांचा दंड ठोठावला आहे.
भाग्यनगर येथील गुलमोहोर कॉलनी येथे वास्तव्यास असणाऱ्या सुखविंदर पृथ्वीसिंग रोनीसिंग या आरोपीवर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी चौकशी करून आरोपीवरील सर्व आरोप सिद्ध झाल्यानंतर त्याला १० वर्षांचा कारावास आणि ५५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
तिसरे अधिक जिल्हा आणि सत्र न्यायालयाने ही सुनावणी केली आहे. तसेच या प्रकरणी मदतीसाठी सहभाग घेतलेल्या गेसी रॉकी डयास या आरोपीला २ लाख रुपयांची दंडाची रक्कम पीडित मुलीला देण्याचा आदेश जिल्हा कायदा प्राधिकरणाने दिला आहे.
दंडातील रक्कमेत ५० हजार रुपयांची रक्कम पीडित मुलीला देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. या प्रकरणी सरकारी वकील म्हणून एल. व्ही. पाटील यांनी काम पाहिले. या प्रकरणी एकूण १४ जणांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या असून