बेळगाव खडेबाजार – शहापूर भागातील विना परवाना व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून ३० हजार रुपयांचा महसूल दंडाच्या रकमेतून जमा करण्यात आला आहे.
शहापूर खडेबाजार भागातील व्यावसायिक परवाना नसलेल्या दुकानदारांकडून आज दंड आकारण्यात आला असून आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय डुमगोळ यांनी खडेबाजार भागातील आस्थापनांना भेट देऊन व्यापारी परवान्यांची तपासणी केली. यादरम्यान विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांकडून दंडाची आकारणी करण्यात आली.
शनिवारी दुपारपर्यंत या भागातील विनापरवाना व्यापार-व्यवसाय जाणाऱ्या व्यापाऱ्यांकडून तीस हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
ही कारवाई करताना महापालिका महसूल विभागाचे परवाना कारकून अनंत पिंपरे, स्वच्छता निरीक्षिका शिल्पा कुंभा, सुपरवायझर संजय पाटील, दयानंद कवालदार, सचिन देमट्टी, नितीन देमट्टी, सुभाष घराणे, किरण देमट्टी यांनी परवाना तपासणी करून दंडादाखल महसूल जमा करून घेतला.