छत्रपती शिवरायांचे मूळ हे कर्नाटकात असल्याचा जावईशोध कर्नाटकचे उपमुख्यमंत्री गोविंद कारजोळ यांनी लावला होता. त्यानंतर सोशल मीडियावर गोविंद कारजोळ यांच्याविरोधात तमाम शिवसैनिकांनी संतप्त प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. बघता बघता या प्रतिक्रिया इतक्या वाढत गेल्या की खुद्द गोविंद कारजोळ यांच्यासाठी शिवसैनिकांनी पुरावे सादर केले आहेत. कर्नाटकातील अनेक नेते नेहमीच निरर्थक वक्तव्ये करून प्रकाशझोतात येण्याचा प्रयत्न करतात. परंतु त्यांच्या अशा निरर्थक गोष्टींचा टप्पा इतक्या खालच्या स्तराला जातो, कि आपण कुणाविषयी काय बोलत आहोत, याचे ताळतंत्र देखील अशा नेत्यांना नसते. गोविंद कारजोळ यांनी छत्रपती शिवरायांबद्दल केलेल्या विधानावर शिवप्रेमींनी सडेतोड उत्तर दिले आहे.
‘बेळगाव लाईव्ह’च्या वाचकांसाठी सोशल मीडियावर प्रकाशित झालेली माहिती छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्वज आणि वंशज.. याबद्दल माहिती प्रसिद्ध करीत आहोत ….
शिवरायांनंतर छत्रपतींच्या ३ शाखा अस्तित्वात आहेत
ते म्हणजे
१) #सातारा शाखेचे सध्याचे छ. उदयन महाराज
२) #करवीर शाखेचे शेवटून दुसरे छ. शाहू महाराज म्हणजे प्रसिद्ध विचारवंत कोल्हापूरचे शाहू महाराज ! आणि करवीर शाखेचे सध्याचे छ. युवराज संभाजीराजे छत्रपती सर्वाना परिचित आहेतच…
आणि
३) #तंजावर शाखा: व्यंकोजी राजे
————————————————
महाराजांचे पूर्वज आणि वंशज..
भोसले घराण्यातील श्री. बाबाजी भोसले (जन्म १५३३) हे च मूळ पुरुष अशी उपलब्ध इतिहासात नोंद आहे (काहीं जण बाबाजी भोसले यांचे वंशज राजपूत घराण्याशी होते असे हि म्हणतात) बाबाजी भोसले हे दौलताबाद ला जन्मले असे इतिहासकार म्हणतात, बाबाजी राजे पुढे वेरूळच्या बाजूला अहमदनगर च्या दक्षिणेला दौड जवळ पांडे वडगाव या गावची जहागिरी मिळाली (त्याना वेरुळचे पाटील भोसले असे देखील संबोधले जाई) सदर गाव आदिलशाह आणि निजामशहा यांच्या सीमेवर असल्याने जहागिरी खूप जोखमीची होती.
त्यांचे प्रथम पुत्रः- मालोजी भोसले , त्यांची पत्नी उमाबाइ ह्या फलटणच्या नाईक-निंबाळकर यांच्या कन्या.
व्दितीय पुत्रः- विठोजी ,पत्नी आउबाइ. याना ८ पुत्र आणि १ कन्या.
(पुत्री अंबिकाबाई १ .संभाजी २.खेलोजी ३ .मालोजी ४ .कबाजी ५.नागोजी ६ .परसोजी ७.त्र्यंबकजी ८. ककाजी)
#मालोजी_भोसले(१५४२-१६१९)
पुत्र
१. शहाजी महाराज – पत्नी- जिजाबाई (सिंदखेड चे लखुजी जाधव यांची कन्या. सिंदखेड चे जाधव हे देवगिरीच्या यादवांचे (जाधवांचे वंशज)
२.शरीफजी -पत्नी दुर्गाबाई. शरीफजी नगरच्या जवळच्या प्रसिद्ध भातवडीच्या लढाईत मारले गेले.
#शहाजी_महाराज (१५९४-१६६४)
शहाजी महाराज अहमदनगरच्या निजामशाहीत नंतर विजापूरच्या आदिलशाहीत सरदार होते. सुरुवातीस नगरची निजामशाही मोगलापासून वाचवण्यासाठी निजामाचा वजीर मलिकम्बरला बरोबर घेऊन मोगलांचा व विजापूरकरांचा पराभव केला. (भातवडीची लढाईं. नगरपासून १५-२० किमी.). भातवडीच्या लढाईत सासरे लखूजी जाधव विरोधात मोगलांच्या बाजूने लढत होते.!!
शहाजी महाराज नंतर विजापूर दरबारी गेले. कर्नाटकात गेले. पुढे त्यांना बेंगळूर जहागिरी मिळाली आणि त्यांनी बेंगळूर शहर उत्तम रित्या वसविले, पुढे दावणगेरे येथे लढाईत घोड्यावरून पडून निधन झाले.
शहाजी महाराज भोसले यांसी ३ पत्नी होत्या –>
पत्नी १.जिजाबाई—-> पुत्र १.सम्भाजी (१६२३), २. छत्रपती शिवाजी महाराज !
पत्नी २. तुकाबाई——-> पुत्र व्यंकोजी उर्फ एकोजी राजे (तंजावर शाखा )
पत्नी ३. नरसाबाई—-> पुत्र – संताजी.
#छत्रपतीशिवाजीमहाराज
पत्नी १. सगुणाबाई (शिर्के घराणे ) —–> कन्या– राजकुवर (गणोजी शिर्के यांची पत्नी.)
पत्नी २. सईबाई (नाईक निंबाळकर यांची कन्या)–> पुत्र –(धर्मवीर) संभाजी
–> कन्या- सखूबाई व इतर २
पत्नी ३.सोयराबाई (हंबीर राव मोहितेंची बहीण ) ——>पुत्र —राजाराम
—–> कन्या- बळीबाई
पत्नी ४.पुतळाबाई (मोहिते घराणे)
पत्नी ५. लक्ष्मीबाइ (विचारे)
पत्नी ६.सकवारबाई (गायकवाड )—–> कन्या -कमळाबाई
पत्नी ७.काशीबाई ( जाधव घराणे)
पत्नी ८. गुणवन्ताबाई (इंगळे यांची कन्या)
#धर्मवीरछसंभाजी_महाराज
१६५७-१६८९
मातोश्री -सईबाई आणि पत्नी – येसूबाई.——-> पुत्र –शाहू (१६८२-१७४९)
संभाजी महाराजांचा वध झाल्यावर येसूबाई व ७ वर्षाचा शाहू मोगलानी कैद केले. १८ वर्षे म्हणजे औरंगजेब मरेपर्यन्त शाहू कैदेत होता. औरंग्जेब मेल्यावर त्याच्या मुलाने शाहू ला मुक्त केले. तोपर्यंत सोयराबाईचे चिरंजीव व संभाजी चे सावत्र भाऊ राजाराम राजे झाले . पुढे औरंग्जेबाच्या त्रासाला कंटाळून राजारामाने जिंजी गाठली व रामचन्द्र अमात्य यांच्या साह्याने मराठेशाही चालवली. राजारामाची पत्नी ताराबाइ हिने सातारा गादी ताब्यात घेतली. पुढे शाहू सुटून आल्यावर शाहू व ताराबाईची लढाई झाली. शाहूने विजय मिळवून सातारा गादी ताब्यात घेतली. व ताराबाईने पन्हाळ्याकडे प्रस्थान केले.
#शाहू_महाराज
मातोश्री- येसूबाइ,
पत्नी
१. सकवारबाई
२. सगुणाबाई. ———-> शाहू निपुत्रिक होते.
————————————————————————–
#छ._राजाराम
मातोश्री:-सोयराबाई ,
पत्नी १. ताराबाई (१६७५-१७६१) ———>पुत्र- शिवाजी(१६९६-१७२६)
२.जानकीबाई
३.राजसबाई ——> पुत्र संभाजी (१६९८-१७६०)
४.अम्बिकाबाई (सती गेली)
५. सगुणाबाई
राजारामाचा मृत्यु १७०० मध्ये सिंहगडावर झाला. (आता गेल्यावर विपन्नावस्थेतील समाधीचे दर्शन घ्या)
त्या नंतरही ताराबाईने औरंगजेब मरेपर्यन्त त्याला झुंज देऊन मराठेशाही टिकवली. ताराबाई ८६ वर्षे जगली. पन दुर्दैवाने भाऊ बंदकीने स्वकीयांच्याच कैदेत तिचे बरेच आयुष्य (३५ वर्षे) गेले. संभाजी (सावत्रमुलगा) व राजसबाई यानी १७ वर्षे आणि शाहूने १८ वर्षे कैदेत ठेवले.
नंतर भोसले घराण्याच्या ३ शाखा पडल्या
१) सातारा
२) करवीर
आणि
३) तंजावर
इतिहासात भोसले घराण्याचे वंशज महाराष्ट्रात च जन्मले अशीच माहिती उपलब्ध आहे त्यामुळे भोसले घराण्यांपैकी कोणाचाही कर्नाटकात जन्म झाला नाही असे आम्ही ठाम पणे सांगू शकतो.
वाचाळवीरांना विंनती आहे कि इतिहास माहिती नाही तर माहित करून घ्या, ऐतिहासिक गोष्ट बद्दल मतदारांना आकर्षित करण्याकरिता स्वार्थ करीता खोटा इतिहास दाखवून अवमान करू नका
जय शिवराय
जय महाराष्ट्र
(सदर माहिती राबिनहूड नामक व्यक्तीने लिहली आहे तीच आम्ही इथे लिहली आहे