Saturday, December 28, 2024

/

सीईटी परीक्षा होणार जुलैमध्ये

 belgaum

कर्नाटक परीक्षा मंडळाच्यावतीने व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षांचे आयोजन ७ जुलै आणि ८ जुलै २०२१ रोजी करण्यात आले आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री आणि उच्च शिक्षणमंत्री सी. एन. अश्वथ नारायण यांनी नुकतीच घोषणा केली आहे.

अन्य राज्यांनी निश्चित केलेले सीईटीचे वेळापत्रक, कर्नाटकमधील पीयूसीच्या दुस -्या वर्षाच्या परीक्षेचे वेळापत्रक आणि सीबीएसईचे वेळापत्रक लक्षात घेऊन सीईटी परीक्षांच्या तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत.

७ जुलै रोजी सीईटी जीवशास्त्र आणि गणितासाठी तर ८ जुलै रोजी भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या विषयांसाठी असेल.

९ जुलै रोजी बाहेरील राज्यातील तसेच कर्नाटक राज्यातील कन्नड भाषा परीक्षा होणार आहेत, अशी माहिती अश्वथ नारायण यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.