मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी काल शुक्रवारी पाच राज्यातील विधानसभा निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली. त्याचप्रमाणे बेळगाव आणि तिरुपती लोकसभा पोटनिवडणूक 6 एप्रिल रोजी होईल, त्याच दिवशी कर्नाटक राज्यातील तिन्ही विधानसभा पोटनिवडणुका घेण्यात येतील अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी काल शुक्रवारी पाच राज्यातील विधानसभा निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली. दरम्यान याच वेळी कर्नाटक राज्यातील तीन विधानसभा आणि बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीची तारीखही जाहीर होईल याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. मात्र बेळगाव आणि तिरुपती या दोन जागांच्या लोकसभा पोटनिवडणूक पोटनिवडणुकीत संदर्भात सुनील अरोरा यांनी काल माहिती जाहीर न केल्यामुळे बेळगावातील लोकसभा पोटनिवडणुकीचा सस्पेन्स अद्यापही कायम राहिला होता. दरम्यान 8 एप्रिल रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. त्यामुळे कर्नाटकातील पोटनिवडणुका जाहीर करण्याबाबत विलंब होत असल्याची चर्चा आहे.
दरम्यान, द न्यू इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, सुनील अरोरा यांनी बेळगाव आणि तिरुपती लोकसभा पोटनिवडणूक 6 एप्रिल रोजी होईल, त्याच दिवशी कर्नाटक राज्यातील तिन्ही विधानसभा पोटनिवडणुका घेण्यात येतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. मात्र कर्नाटकतील निवडणूक वेळापत्रकाची त्यांनी घोषणा केली नाही, परंतु नंतर एक वेगळी अधिसूचना जारी केली जाईल, असे अरोरा यांनी सूचीत केले असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे कर्नाटक राज्यातील तीन विधानसभा आणि बेळगावच्या लोकसभा पोटनिवडणूकच्या 6 एप्रिलच्या अधिकृत घोषणेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. मात्र अर्थसंकल्पावरुन 6 एप्रिलला पोटनिवडणुका जाहीर होतील का? याबाबत अद्यापही साशंकता दिसून येत आहे.