बेळगाव शहरांमध्ये दोन जीटीएस (ग्रेट ट्रिग्नोमेट्रीकल सर्व्हे) बेंचमार्क अर्थात महान त्रिकोणमिती सर्वेक्षण मापदंड आहेत. त्यापैकी एक आहे कॅम्प येथील सेंट मेरीज चर्च आवारामध्ये आणि दुसरा सर्किट हाऊस येथे आहे.
जीटीएस हे एखाद्या ठराविक जागेची समुद्रसपाटीपासूनची उंची मोजण्याचे मानक (स्टॅंडर्ड) मानले जाते. बेळगाव शहरातील जीटीएस बेंचमार्क 1907 मध्ये स्थापित करण्यात आले असून जे समुद्रसपाटीपासून 2523 फूट उंचावर आहेत. ग्रेट ट्रिग्नोमेट्रीकल सर्व्हे (जीटीएस) बेंचमार्क हा समुद्रसपाटीपासूनची उंची मोजण्याचे शाश्वत संदर्भ सर्वेक्षण केंद्र अथवा बिंदु मानला जातो. भारतीय सर्वेक्षण विभागातर्फे देशभरात असे जीटीएस बेंचमार्क अत्यंत अचूकपणे स्थापित करण्यात आले आहेत.
कोणत्याही क्षेत्राचे मूळ समुद्रसपाटीपासूनचे सर्वेक्षण करण्यामध्ये जीटीएस बेंचमार्कची मदत मोलाची ठरते. परंतु बर्याच घटनांमध्ये, जीटीएस बेंचमार्क सर्वेक्षण करण्याच्या क्षेत्रापासून बऱ्याच अंतरावर असू शकतात.
या प्रकरणांमध्ये, स्वयंचलित स्तराच्या उपकरणांचा वापर करून बेंचमार्क मूल्याचे हस्तांतरण करण्याची सर्वात सामान्य पारंपारिक पद्धत आहे. मात्र हे थोडे अवघड काम असून ज्यात बराच वेळ आणि श्रम वाया जाऊ शकतात.
News source:aab