शिवजयंतीचे औचित्य साधून बेळगावच्या कांही युवा कलाकारांनी छ. शिवाजी महाराज यांना समर्पित “शिवसूर्य” हे स्फूर्ती गीत शुक्रवारी रिलीज केले असून अवघ्या 24 तासात या गीताला युट्युबवर हजारांहून अधिक लोकांनी पसंती दिली आहे.
अशी आली सोन पहाट, वारा गाई गुणगान… अशी सुरुवात असणाऱ्या या गीताचे संयोजन, निर्मिती आणि संकल्पना ऋषिकेश शिनोळकर याची आहे.
सदर गीत मुंबईच्या नामांकित गायक कलाकारांनी म्हंटले असून उर्वरित सर्व कलाकार बेळगावचे आहेत. शिवसूर्य गीताला युट्युबवर अवघ्या 24 तासात 1 हजारांहून अधिक लोकांनी पाहून पसंती दिली आहे, हे विशेष होय.
वाढती लोकप्रियता मिळत असलेल्या “शिवसुर्य” गीताचे गायक: जसराज जोशी आणि शुभांगी केदार (दोघेही मुंबई), संगीत: हृषिकेश शिनोळकर, गीतकार: निलेश कोवाडकर, अतिरिक्त गीतकार: अनूप पवार, बेस् गिटार वादक: शंतनू रायजादे, बांसुरी वादक: सुबोध सुतार, साऊंड इंजिनियर: गुलशन शर्मा (ड्रीम म्युझिक स्टुडिओ), व्हिडिओ अँड
पब्लिसिटी डिझाइन: ऋषीकेश जोशी, गाण्याची व्यवस्था, निर्मिती आणि संकल्पना: हृषिकेश शिनोळकर. चित्रिकरण आणि प्रसिद्धी डिझाइनः ऋषीकेश जोशी. व्हिडिओमधील रेखाटने शिवश्री श्री बाबासाहेब पुरंदरे यांच्या “महाराज” या पुस्तकातून घेण्यात आली आहेत. युट्युब वरील शिवसुर्य गीताचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर आणि कमेंट करा, असे आवाहन बेळगावच्या संबंधित सर्व कलाकारांनी केले आहे.