बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात गुरुवारी सायंकाळी झालेल्या वळीव पावसावेळी वीज पडून एकजण ठार झाला आहे.
खानापूर तालुक्यातील निडगल गावात ही घटना घडली आहे. जोयडा गावातील 20 वर्षीय युवक गुरुनाथ नार्वेकर असे वीज पडून मयत झालेल्या युवकाचे नाव आहे.
मयत युवक आपल्या कुटुंबा सोबत निडगल गावात वीट भट्टी वर कामा करीत गेला होता.गुरुवारी सायंकाळी पावसाला सुरुवात होताच विटांच्या राशीवर प्लास्टिक ओढण्यासाठी गेला असता त्याच्या अंगावर वीज पडली या घटनेत त्याचा मृत्यू झाला.
खानापूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.
बेळगावला अवकाळीने झोडपले!
शहर, परिसर आणि तालुक्याला गुरुवारी जोरदार पावसाचा तडाखा बसला. सकाळपासून ढगाळ वातावरण आणि दुपारी जोरदार वाऱ्यासह दमदार पाऊस झाला. दुपारपासून सुरू झालेल्या दमदार पावसामुळे हवेत कमालीचा गारठा निर्माण झाला. अवकाळी आलेल्या पावसामुळे अनेकांची धांदल उडाली. मुसळधार पावसामुळे दुपारनंतर बाजारपेठेतदेखील शुकशुकाट पहायला मिळाला. अनेक ठिकाणी वीज कोसळली असून शेतीचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.