विवाहबाह्य अनैतिक संबंध ठेवणाऱ्या जोडगोळीला रंगेहाथ पकडून गावकऱ्यांनी तब्बल चार तास ट्रॅक्टरला बांधून ठेवल्याची अजब शिक्षा दिल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग तालुक्यातील मुरकटनाळ गावात ही घटना घडली आहे.
चुंचनूर गावातील एका व्यक्तीला मुरकटनाळ येथील एका महिलेसोबत रंगेहाथ पकडले होते.
सदर महिला विवाहित असून या महिलेचे विवाहबाह्य संबंध होते.
आपल्या पतीची नजर चुकवून सदर पुरुषाला भेटण्यासाठी ही महिला मुरकटनाळ या गावी यायची. आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी यांच्यावर पाळत ठेऊन दोघांनाही मध्यरात्री एकत्र रंगेहाथ पकडले आहे. त्यानंतर चार तास दोघांनाही ट्रॅक्टरला बांधून ठेवण्यात आले होते चांगलाच चोप दिला होता.
सदर विवाहित महिलेचे लग्ना नंतर देखील विवाह बाह्य संबंध होते दोघेही एकमेकांना लपून छपून भेटत होते.सदर महिलेच्या कुटुंबियांना याची माहिती मिळताच तिच्यावर पाळत ठेवली होतीआपल्या पतीच्या डोळ्यात पाळत ठेऊन ती घराबाहेर पडली होती गावा बाहेरील शेतवडीत नको त्या अवस्थेत सापडल्याने कुटुंबियांनी ट्रॅक्टरला बांधून ठेवल्याची शिक्षा दिली असल्याची माहिती दिली आहे.
रागाच्या भरात पतीच्या कुटुंबीयांनी त्या दोघांना ट्रॅक्टरला बांधून ठेवले व पुन्हा तसें न करण्याचा इशारा दिला या घटनेचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत कटकोळ पोलीस स्थानक कार्यक्षेत्रात ही घटना घडली आहे. त्याविवाहित महिलेच्या कुटुंबीयांनी प्रियकराला मारहाण देखील केली.