राज्य सरकारने राज्यातील अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये बेळगाव जिल्ह्याचाही समावेश आहे. बेळगाव जिल्ह्यातील तालुका पंचायत कार्यकारी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आले आहेत. एकूण सहा तालुका पंचायत कार्यकारी अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून त्यांना बढतीवर या बदल्या करण्यात आले आहे. त्याचबरोबर जिल्हा पंचायतचे सहकार्य निर्देशक यांची बदली करण्यात आली आहे.
लोकसभा पोटनिवडणूकीच्या पार्श्वभूमीवर या बदल्या झाल्या असाव्यात असेही बोलले जात आहे. बेळगाव जिल्ह्यात एकूण सहा तालुका पंचायत कार्यकारी अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. हुक्केरी येथील तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी भीमाप्णा लाळी यांची बदली कारवार जिल्हा पंचायतमध्ये उपकार्यनिर्देशक म्हणून झाली असून रायबाग येथील कार्यकारी अधिकारी प्रकाश बड्डुर यांची बदली हावेरी येथील जिल्हा पंचायतमध्ये योजना अधिकारी म्हणून तर गोकाक तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी बसवराज हरगनायक यांची बदली बेळगाव जिल्हा पंचायतच्या उपकार्यदर्शी म्हणून बढती झाली आहे.
खानापूर तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी बी. व्ही. अडवीमठयांची बदली झाली असून ते बळ्ळारी येथील जिल्हा पंचायती उपकार्यदर्शी म्हणून असणार आहेत.
अथणी तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी आय. एस. डोळ्ळण्णावर यांना बेळगाव येथील जिल्हा पंचायतमध्ये योजना निर्देशक म्हणून तर चिकोडी येथील तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी समीर मुल्ला यांची बदली हुबळी धारवाड येथील महानगरपालिकेच्या खाली असलेल्या उपआयुक्तपदी करण्यात आली आहे. याचबरोबर बेळगाव जिल्हा पंचायतीमध्ये उपकार्यदर्शी म्हणून काम करणाऱ्या एस. बी. मुळ्ळोळी यांची बदली हावेरी जिल्हा पंचायतीच्या उपकार्यदर्शी म्हणून झाली आहे.