राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने प्रसारित केलेल्या हेल्थ बुलेटीननुसार जिल्ह्यात आज १७ नव्या कोविड रुग्णांची भर पडली आहे. गेल्या महिन्याभरात सातत्याने कोविड रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झालेली निदर्शनास आली असून कोविड वर उपचार घेऊन कोविडमुक्त होत असणाऱ्या रुग्णांची संख्या देखील वाढत आहे.
आजच्या हेल्थ बुलेटीननुसार जिल्ह्यात ८१ कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार सुरु असून बेळगाव तालुक्यातील १०, गोकाकमधील ३, बैलहोंगलमधील १, हुक्केरीमधील १, खानापूर मधील २ अशा एकूण १७ नव्या कोविडग्रस्त रुग्णांची नव्याने नोंद झाली आहे. यानुसार आतापर्यंची कोविड आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे.
एकूण कोविडग्रस्त रुग्णांची चाचणी : ५००२७४
एकूण १४ दिवस होम क्वारंटाईन अवधी पूर्ण केलेल्या रुग्णांची संख्या : ३४२३८
१४ दिवसांचा रुग्णालयीन क्वारंटाईन अवधी पूर्ण केलेल्या रुग्णांची संख्या : ३६४७२
28 दिवसांचा रुग्णालयीन क्वारंटाईन अवधी पूर्ण केलेल्या रुग्णांची संख्या : ४२९४८३
एकूण नमुने घेतलेली संख्या : ४९९१८२
एकूण निगेटिव्ह रुग्णांची संख्या : ४६७०६५
एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या : २६७८०
एकूण मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या : ३४२
कोरोनमुक्त झालेल्या रुग्णांची संख्या : 26357