Monday, December 30, 2024

/

नव्याने आढळले 6 रुग्ण : 72 वर घटली जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या

 belgaum

बेळगांव जिल्हा प्रशासन आणि जिल्हा आरोग्य खात्याच्या अथक प्रयत्नांमुळे जिल्ह्यातील नव्याने आढळणाऱ्या कोरोनाग्रस्तांची संख्या अत्यंत कमी झाली असून जिल्ह्यातील सक्रीय रुग्णांची संख्या आज 72 झाली असून गेल्या 24 तासांत जिल्ह्यात अवघे 6 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. नव्या रुग्णांसह कोरोना बाधितांची एकूण संख्या 26,735 झाली आहे.

बेळगांव जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याच्या सर्व्हिलन्स युनिटने आज शुक्रवारी प्रसिद्धीस दिलेल्या कोरोना वैद्यकीय पत्रकानुसार शुक्रवार दि. 5 फेब्रुवारी 2021 रोजी सायंकाळी 7 वाजेपर्यंत कोरोनासंदर्भात बेळगांव जिल्ह्यात एकूण 4,86,724 व्यक्तींचे वैद्यकीय निरीक्षण करण्यात आले. जिल्ह्यात 14 दिवसांसाठी होम काॅरन्टाईन केलेल्या जिल्ह्यातील व्यक्तींची संख्या 27,766 झाली असून हॉस्पिटलमध्ये आयसोलेशन करण्यात आलेल्या व्यक्तींची संख्या 72 आहे. काॅरन्टाईन अर्थात विलगीकरणाचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण केलेल्या लोकांची संख्या 46,013 आहे, तर काॅरन्टाईनचा 28 दिवसांचा कालावधी पूर्ण केलेल्या व्यक्तींची संख्या 4,12,873 आहे. कोरोना विषाणू संसर्ग निदानासाठी एकूण 4,85,632 जणांचे स्वॅब नमुने घेण्यात आले होते. त्यापैकी 26,735 नमुन्यांचा वैद्यकीय अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असून यामध्ये आज शुक्रवारी नव्याने आढळलेल्या 6 जणांच्या अहवालांचा समावेश आहे. प्रयोगशाळेत धाडलेल्या नमुन्यांपैकी 4,53,512 नमुने निगेटिव्ह असून जिल्ह्यात सक्रिय रुग्ण (ॲक्टिव्ह केसीस) 72 आहेत. त्याचप्रमाणे 2,714 नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 342 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून 26,321 रुग्ण कोरोना विषाणूच्या संसर्गापासून मुक्त अर्थात पूर्णपणे बरे झाले असून त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यात आज शुक्रवारी आढळलेल्या 6 कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये बेळगांव आणि रामदुर्ग तालुक्यातील प्रत्येकी 2 तसेच सौंदत्ती व खानापूर तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.