बेळगाव कँटोन्मेंट बोर्डाने आपल्या हद्दीत विकास कामे राबविण्यासाठी 5 कोटी 32 लाख 5 हजार 392 रुपये खर्चाचा आराखडा तयार केला आहे. या विकासकामांसाठी निविदा काढण्यात आले असून पाच कंत्राटदारांची निवड देखील करण्यात आली आहे.
कॅन्टोन्मेंटच्या कॅम्प हद्दीतील विकास कामांच्या आराखड्याअंतर्गत रस्ते, गटारींचे काँक्रिटीकरण, मोकळ्या जागेत उद्यान निर्मिती, सुरळीत पाणीपुरवठा, ड्रेनेज लाईन दुरुस्ती, शाळा दुरुस्ती आदींचा समावेश आहे. नागरी समस्या निकालात काढण्यासाठी 7 ठिकाणी ही विकास कामे हाती घेतली जाणार असून त्यावर 5 कोटी 32 लाख 5 हजार 392 रुपये खर्च केले जाणार आहेत.
विकास काम आणि त्यासाठी खर्च केला जाणारा निधी पुढील प्रमाणे आहे. उद्यान निर्मिती मद्रास ए स्ट्रीट -1 लाख 43 हजार रु., गटार काँक्रिटीकरण मोची लाईन -1लाख 33 हजार 547 रु., जुना पोस्ट ऑफिस रोड शाळा दुरुस्ती -59 लाख 35 हजार 740 रु.,
बिफ बुचर स्ट्रीट रोड उद्यान निर्मिती -2 लाख 32 हजार 497 रु., जुना पोस्ट ऑफिस रोड पेव्हर्स बसवणे -4 लाख 14 हजार 747 रु., परेड रोड जलवाहिनी दुरुस्ती -18 लाख 66 हजार 963 रु., शुद्ध पाणीपुरवठा केंद्र उभारणे -4 लाख 39 हजार रुपये. या कामांचा दर्जा राखण्याची हमी कंत्राटदारांकडून घेण्यात आली असून 7 विकासकामांसाठी 5 कंत्राटदारांना कामे देण्यात आली आहेत.