Tuesday, February 11, 2025

/

… अन्यथा कर्नाटकातून येणाऱ्या प्रवाशांवर देखील घालू बंदी – सतेज पाटील

 belgaum

कोरोना प्रादुर्भावाचा पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या प्रवाशांना आरटी -पीसीआर चांचणी नसेल तर प्रवेश नाकारला जात आहे. खरंतर कर्नाटकात येणाऱ्या प्रवाशांची जबाबदरी त्याच सरकारने घ्यायला हवी. त्यामुळे भविष्यात कर्नाटकामधून महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व प्रवाशांवर देखील बंदी घालावी लागेल, असा इशारा महाराष्ट्राचे गृहराज्य मंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिला आहे.

कोरोना प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातून कर्नाटकात येणारी वाहतूक थांबविले आहे. तसेच महाराष्ट्र सरकारने कर्नाटकात येणार यांची संपूर्ण आरोग्य तपासणी करून त्यांना कर्नाटकात सोडावे अशी सूचनाही केली आहे. या पार्श्वभूमीवर गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी ही भूमिका घेतली आहे. महाराष्ट्र व केरळ राज्यात वाढत असलेली कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेऊन कर्नाटक सरकारने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

दोन दिवसापूर्वी तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्देशानुसार कोरोना निगेटीव्ह प्रमाणपत्र नसल्यास कर्नाटकात प्रवेश देण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले होते.Banti patil

त्यानुसार कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्र-कर्नाटक आंतरराज्य सीमेवर असणाऱ्या कोगनोळी तपासणी नाक्याच्या ठिकाणाहून प्रमाणपत्र नसलेल्या वाहनचालक व प्रवाशांना सोमवारपासून (22 फेब्रु.) परत महाराष्ट्रात पाठविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे भविष्यात कर्नाटकामधून महाराष्ट्रात येणारी वाहने बंद करावी लागतील. तेंव्हा केंद्र सरकारने यामध्ये हस्तक्षेप करावा अशी मागणी करत याबाबत मुख्य सचिवांशी तसेच कर्नाटक सरकारशी चर्चा केली जाईल, असे मंत्री सतेज पाटील यांनी सांगितले.

देश आणि जगभरातून मुंबई विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांची वैद्यकीय तपासणी करण्याची जबाबदारी महाराष्ट्र सरकारने घेतली आहे. तपासणी करून गरज वाटल्यास त्यांना काॅरन्टाईन करण्याची जबाबदारी देखील मुंबई महापालिकेने घेतली आहे. त्यामुळे कर्नाटक सरकारने त्यांच्या राज्यात येणाऱ्या प्रवाशांची जबाबदारी घ्यायला हवी, अन्यथा कर्नाटकातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांवर देखील बंदी घालू, असे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.