अफीम विक्री करणाऱ्या अड्डयावर धाड टाकत सी ई एन पोलिसांनी कारवाई केली आहे.
होनगानजीक एका पान शॉपवर धाड टाकून सीईएन पोलिसांनी सुमारे 20 लाख रुपये किमतीचे 1 किलो 15 ग्रॅम अफीम हा मादक पदार्थ जप्त केला असून याप्रकरणी तिघा जणांना अटक करण्यात आली आहे.
बरकतखान यल्लाखान (वय 30, रा. वृत्ती पान शॉप राजस्थान धाबा, जोगणहट्टी क्रॉस जोगणहट्टी), कमलेश सुरजनराम बेनीवाला (वय 25, रा. स्टील ग्रील फॅब्रिकेशन गोकुळ रोड, मोरारजीनगर, हुबळी) आणि सावनराम आसाराम बिष्णोई (वय 21, रा. स्टील ग्रील फॅब्रिकेशन चन्नम्मानगर बेळगाव) अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नांवे आहेत.
होनगा जवळील एका पान शॉपमध्ये अफीम या मादक पदार्थाची विक्री केली जात असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळताच सीसीबीआयचे अधिकारी बी. आर. गड्डेकर यांच्या नेतृत्वाखालील खास पथकाने धाड टाकून पान दुकानात दडवून ठेवलेले 1 किलो 15 ग्रॅम अफीम जप्त केले. तसेच या प्रकरणी तिघाजणांना ताब्यात घेतले आहे.
परराज्यातून अफिम आणून त्याची बेळगाव परिसरात विक्री केली जात होती. खास करून पान शॉपमधून हे अफिम विकले जात होते. जप्त केलेल्या या फिल्मची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत अंदाजे 20 लाख रुपये इतकी होते याप्रकरणी गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.
तिघे जण पर राज्यातून अफीम आणून बेळगावात विकत होते होनगा जवळ पुणे बंगळूरू हायवे वरील राजस्थानी धाब्यावरील पान दुकानात या अफीमची विक्री करत होते.