Wednesday, December 25, 2024

/

आधार व मोबाईल क्रमांक रेशन कार्डला लिंक करणे बंधनकारक

 belgaum

केंद्र शासनाच्या आदेशानुसार रेशन कार्डावर धान्याचा लाभ येणाऱ्या सर्व रेशनकार्डधारकांना आपला आधार क्रमांक व मोबाईल क्रमांक रेशन कार्डला लिंक करणे बंधनकारक आहे. याची नोंद नागरिकांनी विशेष करून सधन कुटुंबानी घ्यावी, असे आवाहन अन्न व नागरी पुरवठा खात्याने केले आहे.

अन्न व नागरी पुरवठा खात्याने रेशन वितरण यंत्रणेचे संगणकीकरण करण्याचा निर्णय घेतल्याने लाभार्थीना रेशन दुकानांमध्ये जाऊन आधार लिंकिंग करावे लागणार आहे. यामुळे गरजू लाभार्थी समोर येणार असून बोगस रेशन कार्डधारकही समोर येणार आहेत.

आधार कार्ड बरोबरच कुटुंबातील किमान एक मोबाईल नंबर रेशन कार्डला लिंक करावा लागणार आहे. दरम्यान सधन कुटुंबीयांनी स्वघोषणापत्र देऊन अन्न भाग योजनेतून बाहेर पडावे असे आवाहनही खात्याने केले आहे.

शहर व ग्रामीण भागातील एकूण दोन लाख 81 हजार 334 लाभार्थी पैकी 50 टक्के लाभार्थीने आपले आधार कार्ड लिंक केले आहे. अद्यापही 50 टक्के लाभार्थीने आधार कार्ड लिंक केलेले नाही अन्न भाग्य योजनेतील शिधापत्रिकेतील सर्व लाभार्थींचे मोबाईल नंबर व आधार क्रमांक 100 टक्के लिंक करण्याच्या सूचना केंद्र शासनाने दिल्या आहेत. सार्वजनिक वितरण व्यवस्थेत अधिक पारदर्शकता यावी यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे

केंद्र शासनाच्या सूचनांनुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील प्राधान्य कुटुंब लाभार्थी व अंत्योदय योजनेतील रेशनचे धान्य मिळणाऱ्या रेशन कार्डधारकांना जवळच्या धान्य दुकानातून कुटुंबातील सर्व लाभार्थींचे आधार कार्ड रेशन कार्डशी लिंक करणे बंधनकारक आहे. नोकरदार, पेन्शनधारक व सधन कुटुंबातील लाभार्थी या योजनेतील अन्नधान्याचा लाभ घेत आहेत, अशांचा अन्न व नागरी पुरवठा खात्यामार्फत सर्व्हे केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.