केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने (सीझेडए) भूतरामनहट्टी येथील राणी चन्नम्मा निसर्गधाम (केआरसी) येथे वाघ, सिंह, अस्वल, बिबटे, कोल्हे, गवी रडे यांच्यासह अन्य कांही वन्य प्राणी आणि पक्षी ठेवण्यास परवानगी दिली असून आता या ठिकाणी नुकतेच 3 आशियाई सिंहांचे आगमन झाले आहे.
ट्विटद्वारे मिळालेल्या माहितीनुसार, गणेश आणि प्रिक्षा या सिंह -सिंहिनीच्या नकुल, कृष्णा आणि निरुपमा या तीन छाव्यांना अर्थात सिंहांना गेल्या 12 फेब्रुवारी रोजी योग्य काळजी आणि बंदोबस्तात भूतरामनहट्टी प्राणिसंग्रहालयाच्या ठिकाणी आणण्यात आले आहे. त्यामुळे बेळगावच्या प्राणिसंग्रहालय प्रेमींना या जंगलाच्या राजांचे दर्शन घेण्याची संधी मिळणार आहे.
भूतरामनहट्टी येथील राणी चन्नम्मा निसर्गधामाचे प्राणिसंग्रहालयात मिनी झू रूपांतर करण्याची योजना 2018 साली आखण्यात आली होती.
त्यानंतर आता या तीन आशियाई सिंहांचे बेळगाव प्राणिसंग्रहालयात आगमन झाले आहे. त्याचप्रमाणे येत्या कांही महिन्यात अन्य वन्य प्राण्यांचे देखील या ठिकाणी आगमन होणार आहे.
Nakula,Krishna &Nirupama born to Preksha-Ganesha,on 12.2.2010 have been transported to Bhuthramanahatti zoo popularly known as #Belgaumzoo Animal lovers of region would get an opportunity to view the animals soon. @CZA_Delhi @aranya_kfd @CMofKarnataka @ArvindLBJP @belagavi_news pic.twitter.com/99fr3ZTurd
— Zoos of Karnataka (@ZKarnataka) February 25, 2021
सदर मिनी झूच्या ठिकाणी सफारी कुंपण (फेन्सिंग) घालण्यात आले असून व्याघ्र निवास तयार आहेत. आधी मिळालेल्या माहितीनुसार म्हैसूर आणि बंनेरुघट्टा प्राणिसंग्रहालयातील प्रत्येकी दोन असे एकूण 4 वाघ बेळगावला आणले जाणार आहेत. यासाठी केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या संमतीची प्रतीक्षा आहे.
ताज्या माहितीनुसार 3 सिंह यापूर्वीच भूतरामनहट्टी प्राणी संग्रहालयामध्ये दाखल झाले आहेत. केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या (सीझेडए) वर्गवारीनुसार हे प्राणी संग्रहालय मिनी झू अर्थात लघु प्राणिसंग्रहालय प्रकारात मोडते. भूतरामनहट्टी मिनी झू 34 हेक्टर मध्ये पसरले असून याची सुरुवात 1989 साली झाली होती.