राजहंसगड येथे दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या तरुण – तरुणींनी शिवप्रेमी दुर्गप्रेमींनी चोप दिला होता. यानंतर त्या तरुण तरुणींनी माफीदेखील मागितली. परंतु त्यानंतर शनिवारी काही तथाकथित कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांनी राजहंसगडावर धिंगाणा घातला.
या प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न करून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न तर करण्यात आलाच. परंतु लाखो शिवभक्तांच्या भावनांशी खेळ करून शिवरायांच्या गडाचे पावित्र्यदेखील भंग करण्याचा प्रयत्न या मूठभर कन्नडिगांच्या माध्यमातून करण्यात आला आहे. कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या मर्कटलिलांना आता चोख प्रत्त्युत्तर देण्याची वेळ आली असून शनिवारी कन्नड संघटनांनी घातलेल्या हैदोसाला येळ्ळूर येथील संपूर्ण युवा, आजी माजी लोकप्रतिनिधी आणि येळ्ळूरवासियांच्यावतीने भव्य महा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवार दिनांक १७ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता शिवसेना चौक येळ्ळूर येथून भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीत शेकडोंच्या संख्येने येळ्ळूरवासियांनी सामील व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
कन्नड संघटनांच्या मर्कटलीला सातत्याने सुरु असून केवळ आणि केवळ मराठी भाषिकांना डिवचण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. सातत्याने होत असलेले हे प्रकार म्हणजे पाणी डोक्यावरून जात असल्याची प्रचिती येत आहे. मराठी भाषिक जनतेची ताकद अजूनही या कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांना समजलेली नाही. परंतु मराठी भाषिकांना डिवचण्याची किंमत कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांना खूप महागात पडेल.
मराठी जनता पेटून उठली कि ती कोणत्या स्तराला जाऊन पोहोचेल याची किंचितही माहिती कन्नड संघटनांना नसेल. आणि त्यातूनही छत्रपती शिवरायांसंदर्भात घडवून आणत असलेले असे प्रकार याला तर मराठी भाषिक जनता कदापि माफ करणार नाही, आणि जशास तसे उत्तर देण्यासही मागे पुढे पाहणार नाही, यात तिळमात्र शंका नाही.