टिळकवाडी परिसरात फिल्मी स्टाईलने दुचाकीवरून आलेल्या दोघांनी महिलेचे अडीज तोळ्याचे गंठण लांबविल्याचा प्रकार घडला आहे. दुपारी पावणे दोनच्या सुमारास हि घटना घडली असून दोन्ही चोर फरारी झाले आहेत.
सदर घटनेची अधिक माहिती अशी कि, टिळकवाडी येथील नेहा संतोष पाटील नामक महिला आपल्या नातेवाईकांची वाट पाहत पराठा कॉर्नर, टिळकवाडी परिसरात आपल्या कार जवळ थांबली होती.
या महिलेवर लक्ष ठेऊन असणाऱ्या या दोघा चोरांनी वेळ साधत महिला कारमध्ये बसतेवेळी पाठीमागून येऊन गंठण ओढून नेले आहे.
अडीच तोळे सोन्याचा हार अंदाजे सव्वा लाख रुपये किंमतीचा आहे.दुचाकी चालवणाऱ्या युवकाने महिलेच्या जवळून दुचाकी नेली तर पाठीमागे बसलेल्या आणखी एका युवकाने महिलेच्या गळ्यातील गंठण हिसकावले.
सदर घटनेची नोंद टिळकवाडी पोलीस स्थानकात करण्यात आली आहे.