Monday, December 23, 2024

/

सीमा प्रश्न मोदींसमोर मांडा-ठाकरे सरकार

 belgaum

महानगरपालिकेसमोर अनधिकृत लाल पिवळा ध्वज लावून तणाव निर्माण करणाऱ्या कन्नड संघटनांनी आता महाराष्ट्रातील नेत्यांवरही बंदी घालण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व खासदारांची बैठक घेऊन हा प्रश्न लोकसभेत मांडावा आणि याच बरोबर मराठी आरक्षणासाठी ही आवाज उठवावा अश्या सूचना केल्या आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन्ही दोन्ही गोष्टी सांगाव्यात व सीमा प्रश्नासाठी तातडीने पावले उचलावी अशी मागणीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करावी असे आवाहन या बैठकीत करण्यात आले आहे.

नुकतीच सर्वपक्षीय खासदारांची बैठक घेण्यात आली आहे. बेळगाव सीमा भागाचा खटला सर्वोच्च न्यायालयात आहे. त्याला चालना देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घ्या. याबाबत लोकसभेतही आवाज उठवून त्याला चालना द्यावी असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

सध्या सीमाभागात महानगरपालिकेसमोर लावण्यात आलेल्या लाल पिवळ्या झेंडयामुळे मोठा गदारोळ माजला आहे. नुकतीच शिनोळी येथे शिवसैनिकांनी आंदोलन केले होते कर्नाटक पोलिसांनी सैनिकांना सीमेवर अडवले व काही नेत्यांवर बंदी घातली आहे. त्यामुळे एकच संताप उडाला आहे. अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय खासदारांची बैठक घेऊन या प्रश्नाला चालना मिळावी यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.udhav-thakrey

1956 सालापासून सीमा प्रश्नासाठी शिवसैनिक कायम सीमा बांधवांच्या पाठीशी आहे. या दृष्टिकोनातून आता सीमाप्रश्न ला चालना मिळावी यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात येत आहेत. सर्वपक्षीय खासदारांनाही याबाबत सूचना करण्यात आले आहेत. त्यामुळे सीमाप्रश्न चालना देण्यासाठी मोठे प्रयत्न सुरू होणार आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ही नेहमीच सीमा भागातील जनतेच्या पाठीशी असल्याचे सांगतात. त्यामुळेच आता सीमाप्रश्नाचा खटला तातडीने निकालात काढण्यासाठी पंतप्रधानांना सर्वपक्षीय खासदारांनी भेट घ्यावी असे आवाहन नुकत्याच झालेल्या बैठकीत त्यांनी केले आहे. त्यांनी केलेल्या आव्हानामुळे आता सीमाप्रश्नाच्या खटल्याला चालना मिळेल अशी आशा सीमाभागातील मराठी भाषेतून व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.