बेळगावतील राजस्थानी मारवाडी समाजासाठी स्टार एअर कंपनीने आनंदाची बातमी दिली असून स्टार एअरने बेळगाव हुन थेट जोधपूर विमान सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
आगामी 16फेब्रुवारी पासून बेळगावहुन केवळ 2 तास दहा मिनिटांत जोधपूर विमान सेवा बहाल केली जाणार आहे.सुरुवातीला आठवड्यातून तीन दिवस ही विमान सेवा सुरू असणार आहे.
बेळगाव शहर आणि जवळपास 100 की मी परिसरात हजारोच्या संख्येनी राजस्थानी प्रवासी व्यापार उद्योगाच्या निमित्ताने स्थायिक झाले आहेत ते नेहमी राजस्थानला ये जा करत असतात. आठवड्यातून केवळ सहा रेल्वे जोधपूर आणि अजमेर साठी उपलब्ध आहेत या शिवाय खाजगी बसची देखील सोय आहे मात्र ज्यांना राजस्थानला त्वरित ये जा करण्यासाठी गोवा किंवा मुंबई विमान तळा वरून राजस्थान गाठावे लागत होते.स्टार एअरच्या बेळगाव जोधपूर विमनसेवे मुळे याचा फायदा राजस्थानला जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाश्यांना होणार आहे.
स्टार एअरने या अगोदर बेळगाव अजमेर(किशनगढ)ही विमान व्हाया इंदोर सेवा सुरू केली होती त्याला देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे आता बेळगाव हुन थेट जोधपूर विमान सेवा सुरू होणार आहे.बेळगाव शहरात जोधपूर डिव्हिजन मधील राजस्थानी रहिवाशी अधिक संख्येने वास्तव्य करून आहेत त्यांना याचा लाभ घेता येणार आहे.
बेळगाव हुन सकाळी 10 वाजता जोधपूर कडे उड्डाण करून दुपारी 12:10 ला तर परत 12:40 जोधपूर हुन टेक ऑफ करून दुपारी 2:40 बेळगाव विमान पोहोचणार आहे.मंगळवार गुरुवार आणि रविवार असे तीन दिवस ही विमान सेवा सुरू राहणार आहे.
स्टार एअर ने उडान योजनेत मिळालेले या भागातील सुरत, अहमदाबाद किशनगढ आणि जोधपूर अशी विमान सेवा सुरू केली आहे.