Wednesday, November 27, 2024

/

बेळगावातून आता महाराष्ट्रातील 3 शहरांना स्टार एअरची विमानसेवा

 belgaum

स्टार एअर कंपनी येत्या 25 जानेवारीपासून नाशिकला आपली नवी विमानसेवा सुरू करत असल्यामुळे आता बेळगावकरांना महाराष्ट्रातील 3 शहरांना विमान प्रवास करता येणार आहे. यापूर्वी बेळगावातून मुंबई व पुणे या शहरांना विमानसेवा देण्यात आली होती.

महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक शहराला बेळगावातून विमानसेवा सुरू होणार असल्यामुळे साई भक्तांची चांगली सोय होणार आहे. कारण नाशिकपासून शिर्डी अवघ्या 85 कि. मी. अंतरावर आहे. बेळगावमधून शेकडो भाविक शिर्डी येथील साईबाबांच्या दर्शनासाठी जात असतात.

सध्या हे भक्त एकतर खाजगी वाहने अथवा रेल्वेने साई दर्शनाला जात होते. मात्र आता स्टार एअरने बेळगाव -नाशिक विमान सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवार शुक्रवार व रविवार असे तीन दिवस ही विमानसेवा उपलब्ध असणार असून 2 हजार रुपये असा प्राथमिक तिकीट दर निश्चित करण्यात आला आहे.

उडान -3 योजनेअंतर्गत हा मार्ग मंजूर झाला असल्यामुळे अल्पदरात तिकिटे उपलब्ध होणार आहेत. नाशिकपासून शिर्डी 85 कि. मी. वर असून त्र्यंबकेश्वर 40 कि. मी. अंतरावर असल्याने बेळगाव येथून विमान प्रवास करणे भक्तांसाठी सोयीचे ठरणार आहे.

संजय घोडावत ग्रुपच्या स्टार एअर कंपनीने बेळगावमधून आपल्या हवाई प्रवासी वाहतूक व्यवसायाला सुरुवात केली. सध्या बेंगलोर, मुंबई, सुरत, अहमदाबाद, इंदोर, अजमेर व आता नाशिक अशा शहरांना स्टार एअर विमानसेवा सुरू आहे. भविष्यात अन्य कांही शहरांना विमान सुरू करण्यासाठी स्टार एअर प्रयत्नशील असल्याचेही समजते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.