Friday, December 27, 2024

/

केंद्रीय गृहमंत्र्यांच्या बेळगाव भेटीदरम्यान वाहतूक मार्गातील बदल

 belgaum

येत्या १७ जानेवारी रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे बेळगाव दौऱ्यावर येणार आहेत. नेहरू क्रीडांगणावर होणाऱ्या जनसेवक समावेश समारंभात ते सहभागी होणार आहेत. या समारंभात अमित शहा यांच्यासह इतर अनेक मान्यवर देखील सहभागी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर १७ जानेवारी रोजी सकाळी ७ पासून कार्यक्रम संपेपर्यंत वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. यासाठी पर्यायी मार्गांची व्यवस्थादेखील करण्यात आली आहे.

१) निपाणी, अथणी, चिकोडी, संकेश्वर, यमकनमर्डी, काकती येथून येणारी वाहनांसाठी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ येथील निसर्ग ढाब्याजवळील सर्व्हिस रॉड वरून श्रीनगर गार्डन, शिवबासावनगर मार्गावरून पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. निसर्ग ढाबा, केएलई टॉवर लगत असलेल्या हिंडाल्को अंडर ब्रिज लगत असलेल्या हिंडाल्को मैदानावर पार्किंगची सोय करण्यात आली आहे.

२) गोकाक, कणबर्गी येथून कार्यक्रमस्थळी येणाऱ्या नागरिकांसाठी के. एम. एफ. डेअरी येथून श्री सिदनाळवर क्रॉस मार्गावरून अंजनी नगर मुख्य रस्त्यावरून महंत भवन येथे पार्किंगची सोय करण्यात आली आहे.

३) बागलकोट, रामदुर्ग, यरगट्टी येथून बेळगाव शहरात येणाऱ्या वाहनांसाठी मोदगा, मरकट्टी क्रॉस, चंदनहोसूर, तारिहाळ, हलगा, मार्गावरून येऊन आलारवाड सर्व्हिस रोड, जुना पी. बी. रोड, व्हीआरएल लॉजिस्टिक्स, जिजामाता सर्कल, शनिमंदिर, पोस्टमन सर्कल, खानापूर रोड मार्गे सीपीएड मैदानावर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.Jnmc shah visit

४) हुबळी, धारवाड, बैलहोंगल, सौंदत्ती, कित्तूर, हिरेबागेवाडी येथून येणाऱ्या नागरिकांची सोय अलारवाड सर्व्हिस रोडमार्गे जुन्या पीबीरोड वरून व्हीआरएल लॉजिस्टिक्स, जिजामाता सर्कल, शनी मंदिर, पोस्टमन सर्कल खानापूर रोड मार्गे मैदानावर वाहन पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

५) कारवार हल्ल्याळ, खानापूर या मार्गावरून शहरात येणाऱ्या वाहनांची सोय सीपीएड मैदानावर करण्यात आली आहे.

६) वेंगुर्ला, सावंतवाडी, सुळगा येथून येणाऱ्या वाहनांसाठी हिंडलगा फॉरेस्ट नाका, हिंडलगा गणेश मंदिर, गांधी सर्कल मार्गे सीपीएड मैदानावर पार्किंगची सोय करण्यात आली आहे.

७) बेळगाव शहरातून बाहेर जाण्यासाठी धारवाड, हुबळी, सौंदत्ती, बैलहोंगल, यारगट्टी, बागलकोट, विजापूर, गोकाक, संकेश्वर, अथणी मार्गे होणारी वाहतूक जुन्या पी. बी. रोड मार्गे राष्ट्रीय मागमार्ग क्रमांक ४ वर वळविण्यात आली आहे.

८) केएलई रुग्णालयाकडे येणाऱ्या तात्कालिक वाहन सेवांसाठी केएलई टॉवर आणि कोल्हापूर सर्कल मार्गे वाहतुकीसाठी मुभा देण्यात आली आहे.

या मार्गांवर असेल संपूर्णपणे वाहन संचारास बंदी

राणी चन्नम्मा सर्कलपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, कृष्णदेवराय सर्कल (कोल्हापूर सर्कल), तसेच संगोळी रायन्ना सर्कल पासून कृष्णदेवराय सर्कल पासून जुना पीबीरोड वर जाणाऱ्या वाहनांसाठी बंदी असेल. जुन्या पीबी रोड वरून (एसपी कार्यालय) कोर्टरोडपासून मराठा मंडळ कडे जाणारा मार्ग, मराठा मंडळ रोडपासून अंध विद्यार्थ्यांच्या शाळेकडे जाणारा मार्ग, गंगवाडी सर्कलपासून हॉटेल रामदेव पर्यंतचा मार्ग, शिवबसव नगर केपीटीसीएल कल्याण मंटप, स्मार्ट सिटी रोड, बाळेकुंद्री इंजिनियरिंग कॉलेज मार्ग, केपीटीसीएल मार्गापासून शिवबसव क्रॉस जवळील किसली डेंटल कॉलेज कडे जाणारा मार्ग, हिंदाळकफो अंडर ब्रिज सर्व्हिस रोड पासून केएलई टॉवर कडे जोडणारा मार्ग, बौक्साईट रोडवरील शिवालयाच्या क्रॉस पर्यंत, नेहरू नगर, पहिला आणि दुसरा क्रॉस पासून केएलई मार्ग, लक्ष्मी कॉम्प्लेक्स पासून बाटा शोरूम सिव्हिल हॉस्पिटलकडे जाणारा मार्ग हे सर्व मार्ग १७ जानेवारी रोजी वाहतुकीसाठी संपूर्णपणे बंद राहतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.