रविवारचा संपूर्ण दिवस आज राजकारणाने गाजला असून भाजपच्या नेत्यांनी आज ग्रामीण भागात संपूर्ण दिवस विविध कार्यक्रम हाती घेतले.यामुळे ग्रामीण भागाला आज राजकीय आखाड्याचे स्वरूप प्राप्त झाले होते.
जांबोटी मार्गावरील गणेश बाग येथे ग्रामीण मतदार संघात विजयी झालेल्या भाजपस्थित नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांसाठी भाजप नेत्यांच्यावतीने स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.
ग्रामीण मतदार संघाला भाजपचा बालेकिल्ला बनविण्यासाठी भाजपने कंबर कसली असून त्याची प्राथमिक फेरी म्हणून आज हा स्नेहभोजनाचा उपक्रम हाती घेण्यात आला.
या कार्यक्रमात जिल्हा पालकमंत्री रमेश जारकील्ली यांनी ग्रामीण मतदार संघ आणि गोकाक मतदार संघ हे दोन मतदार संघ म्हणजे आपले दोन डोळे असल्याचे वक्तव्य केले. बेळगाव ग्रामीण मतदार संघात आगामी निवडणुकीत कोणालाहि उमेदवारी मिळूदे परंतु भाजपाला बहुमताने विजयी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले. ग्रामीण मतदार संघात एकात्मतेची कार्य केले पाहिजे, असे मत रमेश जारकीहोळी यांनी व्यक्त केले.
मागीलवेळी ग्रामीण मतदार संघात पराभव पत्करण्यासाठी मी जबाबदार असल्याचे सांगत मागील वेळी झालेला पराभव येत्या निवडणुकीत १८ मतदार संघात भाजपचेच उमेदवार विजयी करण्याचा आपला संकल्प असल्याचे रमेश जारकीहोळी यांनी सांगितले.
ग्रामीण मतदार संघात उमेदवारीसाठी अनेकजण इच्छुक आहेत. उमेदवारी कोणाला द्यायची हे हायकमांड ठरवेल परंतु उमेदवारी कुणालाही मिळाली तरी आपण एकजुटीने प्रयत्न करू, असे रमेश जारकीहोळी यांनी सांगितले.