Friday, March 29, 2024

/

किल्ला तलावात उडी घेऊन वृद्धाची आत्महत्या

 belgaum

मानसिक संतुलन बिगडून नाराज झालेल्या वृद्धाने किल्ला तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी उघडकीस आली.

महंमदयुनूस हसनखान पठाण वय 61 रा.आझाद नगर बेळगावअसे या घटनेत मयत झालेल्या वृद्धाचे नाव आहे.

गुरुवारी दुपारी शहरातील किल्ला तलावांमध्ये या वृद्धाचा मृतदेह तरंगताना आढळून आला त्यानंतर लागलीच याबाबतची माहिती मिळताच मार्केट पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी यांनी लागलीच घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह तलावाच्या काठावर आणवला. त्याचप्रमाणे ओळख पटण्याच्या दृष्टीने मृतदेहाची तपासणी केली असता आझाद नगर मधील वृद्ध असल्याचे निदर्शनास आले.

 belgaum

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मानसिक संतुलन बिगडल्याने 7 जानेवारी रोजी घरातून बाहेर पडले होते त्यानंतर त्यांनी किल्ला तलावात उडी घेऊन आत्महत्या केली गुरुवारी त्यांचा मृतदेह पाण्या बाहेर आला होता.या घटनेची मार्केट पोलीस स्थानकात नोंद झाली असून अधिक तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.